चंद्रपूर: Chandrapur Toofan Trailer चे आज चंद्रपूरमध्ये आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते भव्य अनावरण करण्यात आले. नशामुक्तीसारख्या महत्त्वाच्या सामाजिक विषयावर आधारित असलेल्या “तूफान” या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरने उपस्थितांची उत्सुकता वाढवली. पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या कलाकारांनी आणि निर्मात्यांनी चित्रपटाचा सामाजिक संदेश, ॲक्शन, थ्रिलर आणि मनोरंजनाचा संगम प्रेक्षकांना आकर्षित करेल असा विश्वास व्यक्त केला. (सायको किलर ची स्टोरी, बघा अमेजोन प्राईम वर)
नशामुक्तीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयावर आधारित आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणाऱ्या “तूफान” या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरचे आज चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते दिमाखात अनावरण करण्यात आले.
Chandrapur Toofan Trailer अनावरण सोहळा कसा पार पडला?
ट्रेलर रिलीज करताना आमदार जोरगेवार यांनी चित्रपटाच्या मुख्य कथानकाचे भरभरून कौतुक केले आणि आजच्या तरुण पिढीला नशेच्या भयानक दुष्परिणामांबद्दल जागरूक करणाऱ्या अशा चित्रपटांची समाजाला अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले। या विशेष सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य पत्रकार परिषदेला चित्रपटातील मुख्य कलाकार प्रेम धीरल (नागपूर), शक्ती धीरल (चंद्रपूर), राजेश नायडू (चंद्रपूर), शिव सिंग राठोड (नागपूर), नेहा गुरंग (नेपाळ), धनश्री (अमरावती), तृप्ती ए. (मुंबई) आणि देबोश्री प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी उपस्थित सर्व कलाकारांचा आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार केला तसेच त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि चित्रपटाच्या यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नागपूर येथे पूर्ण झाले असून चंद्रपूर दौऱ्यावर आलेल्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सर्वप्रथम आदिशक्ती माऊली माता महाकालीच्या दरबारात जाऊन दर्शन घेतले आणि चित्रपटाच्या यशासाठी आशीर्वाद मागितला. यानंतर चित्रपटाच्या सर्व कलाकारांनी चंद्रपूर येथील आरसीईआरटी (RCERT) कॉलेजला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आणि चित्रपटाचा जोरदार प्रचार केला, ज्याला महाविद्यालयीन तरुणांनी उत्स्फूर्त दाद देत चित्रपटाच्या विषयाबद्दल कमालीचा उत्साह दाखवला.
हा चित्रपट येत्या १९ जून रोजी चंद्रपूरच्या ऐतिहासिक राजकला थिएटरसह संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे। पत्रकार परिषदेत बोलताना चित्रपटाचे निर्माते आणि कलाकारांनी सांगितले की, “तूफान” हा केवळ निखळ मनोरंजन करणारा चित्रपट नसून तो समाजाला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा संदेश देणारा सिनेमा आहे, ज्यामध्ये आजचा तरुण वर्ग नशेच्या आहारी न जाता आपल्या आयुष्याला आणि भविष्याला कशी योग्य व चांगली दिशा देऊ शकतो हे प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
या चित्रपटात प्रेक्षकांना सामाजिक संदेशासोबतच उत्कृष्ट ॲक्शन, थ्रिलर, सस्पेंस आणि मनोरंजनाचा एक उत्तम मिलाफ पाहायला मिळणार असून हेच संतुलन या चित्रपटाला अधिक खास बनवते, असा विश्वास टीमने व्यक्त केला. या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या चंद्रपूरच्या स्थानिक पत्रकारांनी आणि मान्यवरांनी देखील चित्रपटाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे आणि सामाजिक उद्देशाचे कौतुक करत हा चित्रपट तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा सूर आवळला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
