राजुरा: राजुरा दरोडा प्रकरणात फरार असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या एका संशयिताला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. चोरीच्या दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडी रॉड आणि गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची एकूण किंमत २३ हजार ६०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. संबंधित संशयिताला पुढील कायदेशीर कारवाईसाठी राजुरा पोलिसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणातील इतर दोन संशयितांचा शोध सुरू असल्याचेही वृत्तात नमूद आहे. (धक्का लागला, शर्ट फाडला अन चंद्रपूर भररस्त्यात झाली हत्या, वाचा हि बातमी)
राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यात मागील काही दिवसांपासून फरार असलेला एक सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखा (स्थागुशा), चंद्रपूरच्या हाती लागला आहे. एलसीबीच्या पथकाने एका समांतर तपासादरम्यान या कुख्यात आरोपीला इतर चोरीच्या गुन्ह्यात चोरीच्या मुद्देमाल आणि वाहुन नेण्यासाठी वापरलेल्या मोटारसायकलसह जेरबंद केले आहे. या धडक कारवाईनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी राजुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राजुरा दरोडा प्रकरणात संशयित ताब्यात कसा आला?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना, पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत चोरीस गेलेला ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करीत एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले.
रोहित उर्फ आशिक धनराज वर्मा (वय २७ वर्ष, रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर, जि. चंद्रपूर) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, हाच आरोपी राजुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या दरोड्याच्या गुन्ह्यात (अपराध क्रमांक ३७०/२०२६, कलम ३११०२), ३११, १११ भा.न्या.सं.) मागील काही दिवसांपासून फरार होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले ३ हजार ६०० रुपये किमतीचे लोखंडी रॉड आणि गुन्ह्यासाठी वापरलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल (क्र. MH 34 CF 3495) असा एकूण २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणात अजूनही इतर दोन आरोपी पोलिसांच्या वॉन्टेड यादीत असून, करण इंदू निषाद (रा. रामनगर, ता. राजुरा) आणि यश निषाद (रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर) यांचा पोलीस शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या राजुरा उपविभाग पथकाने ही धडक कारवाई पार पाडली असून, सराईत गुन्हेगाराच्या आवडीनुसार इतर गुन्ह्यांचाही कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






