राजुरा वनक्षेत्रातील चितळाची शिकार प्रकरण

राजुऱ्यात चितळाची शिकार; १९ किलो मांस जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 29, 2026

राजुरा: चितळाची शिकार प्रकरणी राजुरा वन विभागाने चुनाला परिसरात कारवाई केल्याची माहिती आहे. मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी वन पथकाने तीन जणांना ताब्यात घेतले. वन विभागाच्या माहितीनुसार, घटनास्थळावरून १५ किलो कच्चे आणि ४ किलो शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. शिकारीसाठी वापरल्याचा संशय असलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याचे वृत्तात नमूद आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (धक्का लागला आणि भररस्त्यात हत्या, वाचा बातमी)

चुनाला परिसरातून १९ किलो मांस जप्त

राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चुनाला नियत वनक्षेत्रात नर चितळाची शिकार करून त्याचे मांस विल्हेवाट लावल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. राजुरा वन विभागाच्या पथकाने मंगळवारी (२७ ऑक्टोबर) संध्याकाळी चुनाला परिसरात धाड टाकून चितळाचे मांस शिजवणाऱ्या तीन जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान वनपथकाने तब्बल १५ किलो कच्चे आणि ४ किलो शिजवलेले मांस तसेच शिकारसाठी वापरलेली कुल्हाडी जप्त केली आहे.

राजुरा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चुनाला परिसरात एका नर चितळाची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी आणि खाण्यासाठी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनकर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईच्या वेळी आरोपी चितळाचे मांस शिजवत असल्याचे निष्पन्न झाले, तर उर्वरित मांस विक्रीच्या उद्देशाने कापून ठेवण्यात आले होते.

वन विभागाच्या पथकाने घटनास्थळावरून पिंटू गणपती राधी (५०), सुरेश चिलमवार आणि रायमलू लिंगमवार (सर्व रा. चुनाला) या तीन जणांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान घटनास्थळावरून १५ किलो कच्चे मांस, ४ किलो शिजवलेले मांस आणि शिकारीसाठी वापरलेली कुल्हाडी असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये (Wildlife Protection Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सदर धडक कारवाई उपविभागीय वनाधिकारी मंगेश गिरडकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी कारवाईत क्षेत्र सहायक संजय गरमडे, वनरक्षक अंकिता नेवारे, गीता चव्हाण, मीनाक्षी सातपुते, तानाजी कामले, भोजराज दांडेकर, पवन मांदुलवार, मारोती चापले तसेच वनमजूर गंगाधर मोहितकर, संतोष किनाके, बलदेव मेश्राम, नरेश निखाडे आणि गंगाधर सोपनकर यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे वन्यजीव तस्करांचे धाबे दाणाणले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment