धक्का लागल्याने हत्या झालेल्या चंद्रपुरातील जिल्हा रुग्णालयासमोरील घटनास्थळ

धक्का लागला, शर्ट फाडला, भररस्त्यात खुनाचे धक्कादायक कारण समोर

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 28, 2026

चंद्रपूर – धक्का लागल्याने हत्या झाल्याची घटना चंद्रपुरात घडली. जिल्हा रुग्णालयासमोर मंगळवारी (२७ ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास एका युवकाचा मृत्यू झाला.पोलिसांच्या माहितीनुसार, रस्त्याने जाताना धक्का लागल्यावरून दोघांत वाद झाला. वाद वाढून हाणामारी झाली. आरोपीने रस्त्याकडेचा पेव्हर ब्लॉक उचलून युवकाच्या डोक्यावर वार केले. जखमी युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहर पोलिसांनी २९ वर्षीय आरोपीला काही वेळातच अटक केली. मृताची ओळख अजून पूर्णपणे निश्चित झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. (चंद्रपूर शहरात भररस्त्यात हत्या, वाचा बातमी)

धक्का लागल्याने हत्या: वाद कसा वाढला?

चंद्रपूर शहरातील अतिव्यस्त मार्गावरील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मंगळवारी रात्री खळबळजनक घटना उघडकीस आली. शहरातील छोटी बाजार चौक सिग्नलजवळ असलेल्या ‘श्रीमान सावजी भोजनालय’समोर एका युवकावर सिमेंटच्या पेवर ब्लॉकने बेदम हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोराने रस्त्याच्या कडेला पडलेल्या पेव्हर ब्लॉक ने युवकाच्या डोक्यावर ६ ते ७ वेळा वार केले. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

या घटनेत मृतकाची ओळख ३६ वर्षीय रंजीत सुरेश राजवंशी (रा. बल्लारशाह) अशी पटली आहे, तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख पंचशील चौक, जटपुरा वार्ड, चंद्रपूर येथील २९ वर्षीय अमन दीपक कुरवे अशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा यापूर्वीच चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यांच्या रेकॉर्डवर आहे. आरोपीवर वर्ष २०२१ पर्यंत मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गव्हाणे यांनी दिली.

पेव्हर ब्लॉकने वार, रुग्णालयात मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबरच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मृतक रंजित हा रस्त्याने जात असताना अमन कुर्वे ला धक्का लागला, तू धक्का का मारला याबाबत कुर्वे यांनी वाद घातला, वाद वाढला असता रंजित ने अमन चा शर्ट फाडला, रंजित च्या या कृत्याने अमन चा पारा चढला आणि दोघात हाणामारी झाली, अमन चा राग अनावर झाल्याने त्याने रस्त्याच्या कडेला असलेला पेव्हर ब्लॉक उचलत रंजित च्या डोक्यावर जोरात मारला. रंजित खाली कोसळला मात्र त्यानंतरही अमन त्याच्यावर पेव्हर ब्लॉक ने हल्ला करीत राहिला.

हि सर्व घटना या मुख्य मार्गावरून भ्रमण करणाऱ्या नागरिकांनी बघितली मात्र कुणीही अमन ला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही, सदर माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे पोलीस चमू सह दाखल झाले, रंजित ला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, डोक्यावर गंभीर मार व अति रक्तस्राव झाल्याने काही वेळात त्याचा मृत्यू झाला. मृतकाबाबत पोलिसांनी अधिक माहिती मिळवली असता तो बल्लारपूर मधील रहिवासी होता. सकाळी बल्लारपूर नगरपरिषद जवळ रंजित ला फिट आल्याने तो तिथे कोसळला, नागरिकांनी त्याला तात्काळ बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, डॉक्टरांनी रंजित ला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर केले. मृतकाचे नेमके नाव रंजित राजवंशी आहे कि काही दुसरे याबाबत अजूनही संशय आहे. तो मूळचा छत्तीसगड मधील निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तो बल्लारपुरात कुठे राहत होता याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.

घटनेननंतर आरोपी अमन हा फरार झाला होता, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख काढत त्याला काही वेळातच अमन कुर्वे ला तात्काळ अटक केली, उपचारासाठी चंद्रपुरात दाखल झालेल्या रंजित चा पायदळ जाताना धक्का लागल्यामुळे वाद आणि त्यानंतर डोक्यावर पेव्हर ब्लॉक ने हल्ला करीत रंजित चा भररस्त्यात खून होणार असल्याची कुणालाही जाणीव नव्हती मात्र मुख्य मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी हे भयावह दृश्य बघितल्यावर रंजित ला वाचविण्याचा प्रयत्न न केल्याने माणुसकी कुठे हरवली का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment