बकरी चोरी प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केलेले आरोपी आणि जप्त केलेली कार

नागपूरहून चंद्रपुरात येऊन बकरी चोरी; तिघे अटकेत

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 8, 2026

चंद्रपूर: बकरी चोरी उघडकीस आणत चंद्रपूर शहर पोलिसांनी नागपूर येथील तिघांना अटक केली आहे. चोरीस गेलेल्या बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, जप्त केलेला एकूण मुद्देमाल सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. (चंद्रपूरातील मुख्याध्यापिकेची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोलकात्यातून अटक)

बकरी चोरी गुन्ह्याची नोंद आणि तपास

पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत घडलेल्या बकरी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत चंद्रपूर शहर पोलिसांनी नागपूर येथील तीन सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी चोरीस गेलेल्या बकऱ्यांसह गुन्हा करण्यासाठी वापरलेली सुमारे दोन लाख ३० हजार रुपये किमतीची कार हस्तगत केली असून, या धडक कारवाईमुळे शहरात चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बकऱ्या चोरीला गेल्याची तक्रार फिर्यादी यांनी दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता. गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपास पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेतला.

नागपूरच्या तिघांना अटक

तपासादरम्यान पोलिसांनी रजत व्यंकटी देवघरे (वय २६ वर्षे, रा. वैशाली नगर, नागपूर), धरमवीर श्रीराम चौव्हान (वय ३७ वर्षे, रा. शशिकांत सोसायटी, गोरेवाडा, नागपूर) आणि मोहम्मद साजीद खलील कुरेशी (वय ४० वर्षे, रा. हंसापुरी कसाबपुरा, नागपूर) या तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी बकरी चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली, ज्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला माल आणि गुन्ह्यात वापरलेली फोर्ड फिगो कार (क्र. MH-14-CK-0839) असा एकूण अंदाजे २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनखाली, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाने यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक कृणाल रामटेके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, कपिल घुगे, तसेच पोलीस अंमलदार संजय धोटे, संतोष दंडेवार, संतोष कनकम, जावेद सिद्दीकी, रूपेश रनदिवे, कपूरचंद खरवार, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, खंडेराव माने, सुशांत घिवे, प्रशांत कुसरे, सारिका गौरकर, दीपिका झिगरे, लीना काटवले, कार्तिक खनके आणि सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने पार पाडली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “नागपूरहून चंद्रपुरात येऊन बकरी चोरी; तिघे अटकेत”

Leave a Comment