Animal Cruelty प्रतिबंधासाठी चंद्रपूर प्रशासनाकडून अवैध जनावर वाहतूक व कत्तलखान्यांवर कारवाईबाबत बैठक घेतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

Animal Cruelty | बैलगाडी शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट अनिवार्य

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 26, 2026

Animal Cruelty : चंद्रपूर – पशुधन ही आपली खरी संपत्ती असून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी राज्यात अस्तित्वात असलेल्या प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींची ग्रामपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, सहाय्यक आयुक्त डॉ. हरिहर वरठी, सहायक वनसंरक्षक विकास तरसे, गणेश येळणे आणि पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकार प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा रुग्णालयात खासदार धानोरकर पुन्हा धडकल्या)

चंद्रपूर जिल्ह्यात Animal Cruelty वाहतूक रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना?

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे कराव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या की, २१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल व अनधिकृत कत्तलखाने रोखण्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० यांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. Animal Cruelty

या अंतर्गत अनधिकृत कत्तलखान्यांवर कडक कारवाई करणे, अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करणे, संयुक्त भरारी पथके स्थापन करणे आणि सीमावर्ती भागात संयुक्त तपासणी चौक्या उभारणे यासारखी पावले उचलली जातील. तसेच डायल ११२ हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर पोलीस प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही केली जाईल. Animal Cruelty

याशिवाय, संघटित पद्धतीने होणाऱ्या गोतस्करीच्या प्रकरणांमध्ये थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले असून, बकरी ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखून प्राणी क्रूरता प्रतिबंधक तरतुदींचे पालन करणे बंधनकारक राहील. याचसोबत जिल्हाभरात आयोजित करण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यती दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे यांनी नव्याने गठित प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची उद्दिष्टे, तिचे कार्य तसेच भविष्यातील कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती सादर केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment