Chandrapur Atrocity Cases Review Meeting By Collector Vasumana Pant

३ महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात ६ बलात्कार एक खुनाची घटना, जिल्हाधिकारी पंत यांनी घेतला आढावा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 21, 2026

चंद्रपूर : Chandrapur Atrocity Cases Review च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन केले होते. १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ॲक्ट्रोसिटी कायद्यांतर्गत नोंदवलेल्या एकूण ८ गुन्ह्यांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितांना वेळेवर आर्थिक मदत पोहोचवण्याचे कडक निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. (मतदार यादीत हलगर्जीपणा, ५ निलंबित)

Chandrapur Atrocity Cases Review: जिल्हाधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांचा सविस्तर आढावा

चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत ॲक्ट्रोसिटी अंतर्गत एकूण 8 गुन्ह्यांची नोंद झाली असून यात खुनाचा एक गुन्हा, बलात्कार सहा गुन्हे आणि गंभीर मारहाण / दुखापतीच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. सद्यस्थितीत आठही गुन्हे पोलिस तपासावर असून अनुसूचित जाती संदर्भात चार तर अनुसूचित जमाती संदर्भात चार गुन्हे आहेत. तसेच ॲक्ट्रोसिटी कायद्यांतर्गत 73 लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने 77 लक्ष 82 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहेत. यात 28 पिडीतांना पहिला हप्ता तर 45 पिडीतांना दुसरा / तिसरा हप्ता देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, बलात्कार, खुन, विनयभंग संदर्भातील पिडीतांना वेळेवर अर्थसहाय्य मिळण्यासाठी पोलिस विभागाने त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याची माहिती, प्रथम माहिती अहवाल (एफ.आय.आर.), चार्जशीटची प्रत त्वरीत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे द्यावी. जे पोलिस अधिकारी अधिकारी वेळेवर माहिती देणार नाही, अशांना जबाबदार धरून कार्यवाही करावी, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, पोलिस विभागाचे श्री. कांक्रेडवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment