Dak Adalat : चंद्रपूर : पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. मात्र ही सेवा देतांना, संभाषणामध्ये / पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे होणा-या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी 10 जून रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्टर जनरल, नागपूर यांच्या कार्यालयामध्ये डाक अदालत आयोजित करण्यात येत आहे. (निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा)
Dak Adalat साठी तक्रार कशी दाखल कराल?
पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.
उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा, इत्यादी संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक जयंत दाऊ, डाक अदालत, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, नागपूर क्षेत्र, शंकरनगर डाकघर कार्यालय, पहिला माळा. नागपूर- यांचे नावे दोन प्रती सह 8 जून 2026 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे
सहायक निर्देशक यांनी कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






