• Chandrapur MD Drug Case मध्ये रामनगर पोलिसांनी एमडी पावडर जप्त केली

Chandrapur MD Drug Case । दिवसा POP चे काम सायंकाळी एमडी पावडरची विक्री

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 31, 2026

Chandrapur MD Drug Case : चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री चे नेटवर्क पसरले आहे, पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना याबाबत कारवाईचे निर्देश दिल्यावर पोलीस यंत्रणा कामावर लागली आहे. रामनगर पोलिसांनी ३० मे रोजी रयतवारी कॉलोरी परिसरात एमडी पावडर विक्री करणाऱ्या २६ वर्षीय युवकाला अटक करीत ७५ हजाराचे एमडी पावडर जप्त केले. (ब्लॉक व अनब्लॉक चा राग, प्रियकराने विवाहित प्रेयसीचा चिरला गळा)

Chandrapur MD Drug Case मध्ये पोलिसांची कारवाई

बगडखिडकी रेल्वे गेट परिसरात प्रीतम पान ठेल्यावजवळ २६ वर्षीय शेख साबीर शेख हा युवक दुचाकी वाहनाने येत त्याठिकाणी MD पावडर विक्री करण्यासाठी उभा होता. रामनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी साबीर शेख ला ताब्यात घेत विचारपूस केली.

साबीर शेख बागड खिडकी अरबी मदरसा जवळ राहतो, उदरनिर्वाहासाठी तो POP चे काम करतो अशी माहिती त्यांनी दिली, पोलिसांनी साबीर ची झडती घेतली असता त्याचे जवळून १५.०९ ग्राम MD पावडर आढळून आले, सोबतच एक मोबाईल व दुचाकी वाहन असा एकूण १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर एमडी पावडर हे साबीर ने बागड खिडकी जवळ राहणाऱ्या इसमाकडून आणल्याचे सांगितले, एमडी पावडर साबीर ला देणारा आरोपी सध्या पसार आहे. रामनगर पोलिसांनी साबीर शेख वर NDPS कलम ८ (क), २२ (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल केला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, पोउपनि कृष्णा दराडे, रामचंद्र नैताम, आनंद खरात, प्रकाश बल्की, शरद कुडे, बाबा नैताम, जितेंद्र आकरे, प्रकाश मडावी, संदीप, पंकज ठोंबरे, सुरेश कोरवार, रवीकुमार ढेंगळे, पंकज पोंदे व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment