चंद्रपूर जुगार कारवाई करणारे शहर पोलीस ठाण्याचे पथक

जंगलात मध्यरात्री पत्त्यांचा डाव, पोलिसांनी ८ जणांना पकडले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 14, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर जुगार कारवाई अंतर्गत शहर पोलिसांनी आरवट गावाजवळील जंगल परिसरात ८ जणांना ताब्यात घेतले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पत्त्यांवर पैशांची बाजी लावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शहरात अवैध जुगाराविरुद्ध पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरूच ठेवली असून, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरवट गावाजवळील जंगल परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ५२ पत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या ८ जुगारींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि नगदी मिळून एकूण ९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सर्व आरोपींवविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक, वाचा हि बातमी)

चंद्रपूर जुगार कारवाई: आरवट जंगलात पोलिसांचा छापा

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घाजत असताना, आरवट गावाजवळील जंगल परिसरात काही जण जमून दिव्याच्या उजेडात पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मुखбіरा मार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष आरवट गावाच्या शेतशिवारात आणि जंगल परिसरात छापा टाकला. अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या जुगारींना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले.

८ जणांना ताब्यात, ९,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे प्रकाश पुरुषोत्तम करमरकर (वय ३९), प्रफुल रूपचंद गिरडकर (वय २८), अक्षय टिकाराम धामंगे (वय ३०), देवानंद श्यामराव गिरडकर (वय ५८), नरसिंग पोचम मंथन (वय ४२), संदीप नथ्थुजी करमरकर (वय ३६), फिरोज हजरत अली सय्यद (वय ४२) आणि राहुल रमेश चांदेकर (वय २६, सर्व रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर) असल्याचे सांगितले.

घटनास्थळाची आणि आरोपींच्या अंगझडती घेतली असता, डावावर हारजीतचा खेळ खेळताना मिळालेले नगदी १ हजार ५०० रुपये, ५२ तासपत्ते, एक जुना वापरता टॉर्च तसेच सर्व आरोपींच्या अंगझडतीतून रोख रक्कम असा एकूण ९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कपिल प्रकाश घुगे यांच्या फिर्यादीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तू भिकादास कोलते करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment