वरोडा कोंबड्यांची झुंज जुगारावर कारवाई करणारे राजुरा पोलीस

वरोड्याच्या अमराईत कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; राजुरा पोलिसांचा छापा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 23, 2026

चंद्रपूर: राजुरा तालुक्यातील वरोडा कोंबड्यांची झुंज जुगारावर पोलिसांनी रविवारी (२२ नोव्हेंबर) दुपारी छापा टाकला. वित्तुबाबा मंदिराजवळील अमराईत झुंजीवर पैशांची बाजी लावली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. राजुरा पोलिसांनी पाच जणांसह दुचाकी चालकांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(ब) अन्वये गुन्हा नोंदवला. १० मोटारसायकली, दोन कोंबडे आणि दोन लोखंडी कातींसह ७ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (आरवट मध्ये कोंबड्याच्या झुंजीवर जुगार, पोलिसांची कारवाई)

राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोडा परिसरात वित्तुबाबा मंदिराजवळील अमराईत कोंबड्यांची झुंज लावून पैशांची बाजी लावत सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. रविवारी (ता. २२ नोव्हेंबर) दुपारी साडेबारा ते सव्वादोनच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत पोलिसांनी पाच जणांसह विविध दुचाकींच्या चालकांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून तब्बल १० मोटारसायकली, दोन कोंबडे आणि लोखंडी कातींसह एकूण ७ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (वरोडा कोंबड्यांची झुंज)

वरोडा कोंबड्यांची झुंज: पोलिसांना कशी मिळाली माहिती?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राजुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देवराम पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह रविवारी दुपारी पोलीस ठाणे हद्दीत खासगी वाहनाने गस्त घालत होते. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार, सहाय्यक फौजदार राजेंद्र जुमनाके, पोलीस हवालदार संदीप बुरडकर, पोलीस अंमलदार संदीप भिवनकर, संतोष पोले आणि मुनेश्वर यांचा समावेश होता. गस्तीदरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली की वरोडा (ता. राजुरा) येथील वित्तुबाबा मंदिराजवळील अमराईत काही जण कोंबड्यांची झुंज लावून हारजीतचा जुगार खेळत आहेत.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी गुरुदेवनगर धोपटाळा येथील पाशा शेख मेहबूब शेख (वय ३६) आणि वरोडा येथील आदित्य जनार्धन करमनकर (वय २४) यांना पंच म्हणून पाचारण केले. त्यांना घटनेची माहिती देऊन लेखी सूचनापत्र बजावण्यात आले आणि पंच म्हणून सोबत घेतले.

पाच जणांवर गुन्हा; १० दुचाकी आणि कोंबडे जप्त, वरोडा कोंबड्यांची झुंज

त्यानंतर पोलीस पथक आणि पंचांनी वरोडा येथील वित्तुबाबा मंदिराजवळील अमराईकडे धाव घेतली. तिथे काही नागरिक कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळताना दिसून आले. पोलिसांना जवळ येताना पाहताच जुगार खेळणारे पळून जाऊ लागले, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत पाच जणांना ताब्यात घेतले. पंचांच्या समक्ष विचारपूस केली असता शुभम अशोक मडावी (वय २८, रा. चार्ली, ता. राजुरा), भार्गव संजय वराडकर (वय १९, रा. वढा, ता. जि. चंद्रपूर), अभिनव विठ्ठल पानघडे (वय ३१, रा. पेल्लोरा, ता. राजुरा), प्रमोद काशीनाथ दुबे (वय ५२, रा. पेल्लोरा, ता. राजुरा) आणि गौरव सुरेश बावणे (वय २६, रा. कळमना, ता. बल्लारपूर) अशी त्यांची नावे स्पष्ट झाली.

कारवाईदरम्यान पंचांच्या समक्ष आरोपींची आणि घटनास्थळाची झडती घेत पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये शुभम मडावी याच्या ताब्यातील अंदाजे दीड किलो वजनाचा काळा-पांढरा कोंबडा (किंमत ३०० रुपये), भार्गव वराडकर याच्या ताब्यातील अंदाजे दोन किलो वजनाचा काळा-लाल कोंबडा (किंमत ३५० रुपये) आणि घटनास्थळावरील प्रत्येकी ५० रुपये किमतीच्या दोन लोखंडी काती (१०० रुपये) यांचा समावेश आहे.

याशिवाय आरोपींच्या ताब्यातील आणि घटनास्थळी आढळलेल्या मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या, ज्यामध्ये अभिनव पानघडे याच्या ताब्यातील स्प्लेन्डर प्लस (क्र. एमएच ३४ बीयू २७४८, किंमत ७० हजार रुपये), प्रमोद दुबे याच्या ताब्यातील बजाज १०० (क्र. एमएच ३४ बीके ७७५१, किंमत ५० हजार रुपये) आणि गौरव बावणे याच्या ताब्यातील बजाज पल्सर (क्र. एमएच ३४ सीडब्ल्यू ९६४९, किंमत ८० हजार रुपये) या दुचाकींचा समावेश आहे. (वरोडा कोंबड्यांची झुंज)

जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(ब) अन्वये कारवाई, वरोडा कोंबड्यांची झुंज

तसेच घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात आलेल्या आणखी सात जुन्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या, ज्यामध्ये बजाज पल्सर (क्र. एमएच ३४ डीपी ८५८४, किंमत ८० हजार रुपये), हिरो पॅशन प्रो (क्र. एमएच ३४ एएस १७९३, किंमत ७० हजार रुपये), हिरो पॅशन प्रो (क्र. एमएच ३४ एएस ०४५१, किंमत ७० हजार रुपये), होंडा शाईन (क्र. एमएच ३४ बीडब्ल्यू १९६७, किंमत ८० हजार रुपये), हिरो होंडा स्प्लेन्डर प्लस (क्र. एमएच ३४ वाय २९२८, किंमत ७० हजार रुपये),

हिरो होंडा स्प्लेन्डर (क्र. एमएच ३४ झेड ७८०२, किंमत ६० हजार रुपये) आणि होंडा युनिकॉर्न (क्र. एमएच ३४ बीयू ८४११, किंमत ९० हजार रुपये) यांचा समावेश आहे. अशा प्रकारे कोंबडे, लोखंडी काती आणि एकूण दहा दुचाकी मिळून ७ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याद्वारे ताब्यात घेण्यात आला. (वरोडा कोंबड्यांची झुंज)

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देवराम पाटील यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून ५४ मिनिटांनी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०८३९ अंतर्गत पाचही आरोपींसह संबंधित दुचाकी चालकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परागकुमार अशोकराव उल्लेवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment