चंद्रपूर :- उत्सव वीज सुरक्षा चंद्रपूर जिल्ह्यात पाळण्याचे आवाहन महावितरणने सार्वजनिक उत्सव मंडळांना केले आहे. नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हे दोन्ही उत्सव काही दिवसांवर आले आहेत. हे उत्सव आनंदात आणि निर्विघ्न पार पडावेत, यासाठी मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे महावितरणने म्हटले आहे. रोषणाई, मंडप, गरबा, महाप्रसाद, रावण दहन आणि भोजनदान यासाठी लागणारी वीज व्यवस्था अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घ्यावी, अशी सूचना आहे. (चंद्रपुरात १६ ऑक्टोबरपासून पाणी कपात, वाचा महत्वाची बातमी)
नवरात्रातील रोषणाई, देखावे, मंडप, गरबा महाप्रसाद, रावण दहन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्याने करण्यात येणारी रोषणाई, भोजनदान व इतर कार्यक्रमासाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. याशिवाय सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
सार्वजनिक सुरक्षा महत्वाची
•नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि इतरही धार्मिक आयोजना दरम्यान मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयन रम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युततारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
•गरबा, जागर आदिचे आयोजन विद्युत यंत्रणेपासून लांब अंतरावर करावे.
•वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे.
•जवळच्या वीज खांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये.
•वीजजोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी, तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






