chandrapur police harassment case

चंद्रपुरातील दिलीप यादव मृत्यू प्रकरणात CID ची एंट्री

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 18, 2026

चंद्रपूर: (chandrapur police harassment case) अंतर्गत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांच्या कथित मानसिक छळाला कंटाळून दिलीप यादव नावाच्या व्यक्तीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक खळबळजनक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे घेत छळाचा आरोप केला होता. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक यांनी तातडीने संशयित पोलिसांना मुख्यालयात संलग्न केले असून संपूर्ण तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. (हे हि वाचा – पोलीस मला त्रास देत आहे)

chandrapur police harassment case : पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची नावे

जिल्ह्यात पोलिसांच्या कथित छळाला कंटाळून एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी घटना चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नुकतीच घडली आहे. दिलीप यादव असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक खळबळजनक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी चंद्रपूर पोलीस विभागातील सोनावणे, रुपेश पराते व भावना मॅडम यांची नावे घेतली, त्यांच्या त्रासामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी विष प्राशन केले आणि दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या संतापजनक प्रकारानंतर मृत दिलीप यादव यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यादव कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका गांजा तस्करी किंवा तत्सम कारवाईच्या प्रकरणात दिलीप यादव यांचे नाव नाहक गोवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. पोलीस इतक्यावरच थांबले नाहीत, तर या कारवाईतून नाव वगळण्यासाठी आणि केस न करण्यासाठी ते यादव यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत सतत दबाव टाकत होते. पोलिसांकडून होणाऱ्या या सततच्या त्रासाला, मानसिक जाचाला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून अखेर हताश झालेल्या दिलीप यादव यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली, असा थेट आरोप त्यांच्या कुटुंबीयांतर्फे करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दुसरीकडे, या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी तातडीने यात लक्ष घातले असून संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, तपासात पूर्णपणे निष्पक्षता राहावी यासाठी कायदेशीर प्रक्रियेनुसार मृत दिलीप यादव यांचा ‘इनक्वेस्ट पंचनामा’ स्वतः विशेष दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत व थेट देखरेखीखाली पूर्ण करण्यात आला आहे.

तसेच मृत्यूचे अचूक व तांत्रिक कारण समोर यावे याकरिता मृतदेहाचे शवविच्छेदन तज्ज्ञ वैद्यकीय चमूद्वारे (Medical Board) करण्यात आले असून या संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य आणि स्थानिक पोलिसांवर झालेले आरोप पाहता, स्थानिक पातळीवर तपास न ठेवता पोलीस अधीक्षकांच्या थेट शिफारसीवरून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करण्यात आला असून, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीचे पथक करत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment