RCERT Chandrapur Cancer Awareness seminar on cervical cancer prevention

चंद्रपूर आरसीईआरटी महाविद्यालयात महिला आरोग्यासाठी पुढाकार; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती कार्यशाळा संपन्न

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 3, 2026

चंद्रपूर : RCERT Chandrapur Cancer Awareness चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात महिलांसाठी विशेष कार्यक्रम पार पडला. आरसीईआरटी वेलनेस सेंटरच्या वतीने गर्भाशय मुखाचा कर्करोग विषयावर ही जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. सी. जी. पटेल सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थिनी आणि महिला प्राध्यापकांची मोठी उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला. (हे हि वाचा – रस्ता सुरक्षा बैठकीत अधिकाऱ्यांची दांडी, खासदार धानोरकर संतापल्या)

कार्यक्रमात महिलांना कर्करोगाची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः एचपीव्ही संसर्ग टाळण्यासाठी वेळेवर लसीकरण करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले.

RCERT Chandrapur Cancer Awareness : महिला आरोग्यासाठी विशेष उपक्रम

महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय (RCERT), चंद्रपूर येथे आरसीईआरटी वेलनेस सेंटरच्या वतीने ‘गर्भाशय मुखाचा कर्करोग’ (Cervical Cancer) या विषयावर एकदिवसीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सी. जी. पटेल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील महिला प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आरसीईआरटी वेलनेस सेंटरच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी SVF Foundationच्या प्रोजेक्ट डायरेक्टर अनुराधा एस. बागला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच चार्टर्ड अकाउंटंट अमित चांडक यांची उपस्थिती होती. SVF Foundationच्या डॉ. दीपिका चांदोक यांनी मार्गदर्शक वक्त्या म्हणून महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला SVF Foundationचे शैलेश बागला यांचीही उपस्थिती होती.

HPV संसर्ग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन

कार्यक्रमादरम्यान गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच वेळेवर तपासणीचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः HPV (Human Papillomavirus) संसर्ग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांचा संबंध, तसेच HPV लसीकरणाची भूमिका याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

HPV लसीकरणामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे योग्य वयात लसीकरण करून घेणे आणि नियमित आरोग्य तपासणीबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गैरसमज दूर करून शास्त्रीय माहिती पोहोचविण्यावर भर
महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी असलेले गैरसमज दूर करून योग्य व शास्त्रीय माहिती पोहोचविणे, आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता वाढविणे तसेच आरोग्यविषयक जबाबदार आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रोत्साहन देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

महिलांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहावे, नियमित तपासण्यांचे महत्त्व समजून घ्यावे आणि उपलब्ध प्रतिबंधात्मक उपायांचा योग्य वेळी लाभ घ्यावा, यावरही कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला. विद्यार्थिनी, महिला प्राध्यापक व कर्मचारी यांना आरोग्यविषयक प्रश्नांबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेण्याची संधी मिळाल्याने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. देवश्री कोडगिरे यांनी केले, तर प्रास्ताविक अनुराधा बागला यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच HPV लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम विद्यार्थिनी तसेच महिला प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक ठरला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment