RCERT Chandrapur Space Day celebration with ISRO scientists

चंद्रपुरात ISRO तज्ज्ञ का आले? जाणून घ्या

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 12, 2026

चंद्रपूर : RCERT Chandrapur Space Day मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये हा विशेष कार्यक्रम झाला. ISRO च्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या सहकार्याने याचे आयोजन केले होते.

सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), Chandrapur येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग, CSI आणि IIC सेल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर NRSC Hyderabad आणि रीजनल रिमोट सेन्सिंग सेंटर (RRSC), नागपूर यांच्या सहकार्याने ‘राष्ट्रीय अंतराळ दिन २०२६’ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच ‘स्पेस एक्सप्लोरेशन अँड गगनयान मिशन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. खारतमल ज्ञानेश्वर शंकर, Purchase & Stores Officer, National Remote Sensing Centre (NRSC), Hyderabad, श्री. चोक्कय्यागारी साईचरण, Scientist/Engineer-SC, Regional Remote Sensing Centre (Central), Nagpur तसेच श्री. सुशील कुमार यांनी विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन, अवकाश तंत्रज्ञान, गगनयान मोहीम आणि या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधत अंतराळ संशोधन व तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. नितीन जे. जानवे तसेच प्रा. माधवी साडू (CSI समन्वयक) यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण होऊन संशोधन, नवोपक्रम आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळाली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंजुम कुरेशी यांनी केले, तर मेहक कुरेशी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment