Asolamendha Canal Drowning Incident Savali Chandrapur

सावलीत मित्रांच्या डोळ्यांसमोरच वाहून गेला दहावीतील नैतिक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 11, 2026

सावली (चंद्रपूर): Asolamendha Canal Drowning च्या या दुर्दैवी घटनेत सावली येथील एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा नहरात बुडून मृत्यू झाला आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात निर्दयी बापाने ८ वर्षीय मुलाची केली हत्या)

नैतिक विठ्ठल शेडमाके असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो सावलीतील रमाबाई आंबेडकर विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता.

सोमवारी सायंकाळी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला नैतिक आसोलामेंढा नहराच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नैतिक सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसोबत कॅनॉलवर पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा वेग जास्त असल्याने तो प्रवाहात वाहून जाऊ लागला. सोबत असलेल्या मित्रांच्या डोळ्यांसमोरच तो पाण्यात गडप झाला. या घटनेने घाबरलेल्या दोन्ही मित्रांनी कोणालाही काही न सांगता घरात पळ काढला.

रात्री उशिरापर्यंत नैतिक घरी न परतल्याने पालकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मंगळवारी सकाळी मित्रांनी कॅनॉलवर घडलेला सर्व प्रकार उघड केला. त्यानंतर पालकांनी तातडीने सावली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कॅनॉल पात्रात शोधमोहीम हाती घेतली. अखेर मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भवराळा परिसरातील कॅनॉलमध्ये नैतिकचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सावली शहर आणि शाळा परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून सावली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment