चंद्रपूर : श्रेयस टोंगे जलतरण स्पर्धेत चमकला आहे. चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालयातील (RCERT) या विद्यार्थ्याने तीन प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला. श्रेयस संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (डेटा सायन्स) विभागाच्या तृतीय वर्षात शिकतो. बारामती येथील School of Pharmacy & Research Center येथे ही स्पर्धा झाली.
त्याने २०० मीटर वैयक्तिक मेडले, ४०० मीटर वैयक्तिक मेडले आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारांत अव्वल स्थान पटकावले. एकाच स्पर्धेतील ही कामगिरी महाविद्यालयासाठी अभिमानाची ठरली आहे. (१४ कोटीच्या बस स्थानकाची दयनीय अवस्था, वाचा बातमी)
श्रेयस टोंगे जलतरण स्पर्धेत तिन्ही प्रकारांत अव्वल
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय (RCERT), चंद्रपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (डेटा सायन्स) विभागाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी श्रेयस नितीन टोंगे याने जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बारामती येथील School of Pharmacy & Research Center येथे आयोजित जलतरण स्पर्धेत श्रेयसने तीनही स्पर्धा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याची चमक दाखविली.
या स्पर्धेत श्रेयसने २०० मीटर वैयक्तिक मेडले, ४०० मीटर वैयक्तिक मेडले आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक या तिन्ही प्रकारांत अव्वल स्थान मिळविले. एकाच स्पर्धेत तीन प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविण्याची त्याची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
श्रेयसच्या या यशाबद्दल सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा संचालक प्रा. आदित्य आंबटकर यांनीही श्रेयसचे कौतुक करून त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा व इतर क्षेत्रांतील सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याची महाविद्यालयाची परंपरा या यशातून अधोरेखित झाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







