भाऊचा दांडिया २०२६ बक्षीस वितरण सोहळ्यात खासदार प्रतिभा धानोरकर विजेत्यांसोबत

चंद्रपुरात ‘भाऊचा दांडिया २०२६’ चा बक्षीस वितरण सोहळा; किंग-क्वीन कोण ठरले?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 22, 2026

चंद्रपूर: भाऊचा दांडिया २०२६ चा बक्षीस वितरण सोहळा चंद्रपुरात पार पडला. द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ मित्र परिवार यांनी चंद्रपूर पोलीस फुटबॉल ग्राउंड येथे याचे आयोजन केले होते. खासदार प्रतिभा धानोरकर यावेळी उपस्थित होत्या. दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणी सांगून त्यांनी ही परंपरा सुरू राहील, असे म्हटले. स्पर्धेत अनुराग घोरपडे ‘किंग’ आणि मनीषा सरकार ‘क्वीन’ ठरले. विविध वयोगट आणि प्रकारांतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. (उत्सवाच्या आनंदात शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत. वाचा बातमी)

द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट व बाळूभाऊ मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पोलीस फुटबॉल ग्राउंड येथे आयोजित ‘भाऊचा दांडिया २०२६’ या भव्य महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा अतिशय दिमाखात व उत्साहात पार पडला. या शानदार सोहळ्याने दांडिया महोत्सवाची सांगता अत्यंत आनंददायी वातावरणात झाली.

भाऊचा दांडिया : खासदार धानोरकर यांचे मनोगत

या प्रसंगी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावूक मनोगत व्यक्त केले. चंद्रपूर जिल्ह्यात ‘भाऊचा दांडिया’ ही केवळ एक स्पर्धा नसून ती एक सांस्कृतिक परंपरा आहे आणि ही परंपरा यापुढेही अशीच अविरतपणे सुरू राहील, असे त्या म्हणाल्या. तसेच इतर सामाजिक व सर्व क्षेत्रांतील जनतेच्या पाठीशी आपण सदैव खंबीरपणे उभी राहू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. चंद्रपूरकरांनी दिलेल्या अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा महोत्सव इतक्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणे शक्य झाले, असे सांगत त्यांनी सर्व चंद्रपूरकरांचे मनःपूर्वक आभार मानले.

किंग, क्वीन आणि चॅम्पियन किताबाचे मानकरी

या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या नृत्यकौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेतील मुख्य व सांघिक गटात आनंद यशवंत इंगोले आणि सुष्मिता सुशील मल्लेक यांनी चॅम्पियनचा किताब पटकावला. मुख्य किताबांमध्ये ‘किंग’ म्हणून अनुराग घोरपडे तर ‘क्वीन’ म्हणून मनीषा सरकार यांची निवड करण्यात आली. युगल गटात आर्य प्रवीण कोहापरे व आदित्य अनिल राठोड यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर शर्वरी बनकर व आकाश मडावी यांनी द्वितीय आणि रोहण राजपूत व सोफी सदर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

सोलो नृत्य स्पर्धेत मुलांच्या गटात धनंजय मेश्राम प्रथम, सुहास बौरिया द्वितीय व आर्य विटेकर तृतीय राहिले; तर मुलींच्या गटात दिव्याणी भरत मंदाडे हिने प्रथम, इशिका धनेश व्यास हिने द्वितीय व अमृता दादमल हिने तृतीय क्रमांक पटकावला. लहान मुलांच्या गटात दक्ष राजू दार्वे (प्रथम), कौशिक अतिश कुलमेथे (द्वितीय) व जियांशू प्रफुल वांधारे (तृतीय) यांनी बाजी मारली; तर लहान मुलींमध्ये आरोही गौतम मून (प्रथम), कियारा बेलन्स (द्वितीय) व आरिणी ढाकते (तृतीय) विजेत्या ठरल्या. ३५ वर्षांवरील गटात प्रिन्स रामटेके यांनी प्रथम, स्नेहा ढाकते यांनी द्वितीय व सविता भालचंद्र पंचालवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

विशेष पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट पोशाख श्रेणीत श्रेया सुनील असार विजेती ठरली. तसेच, ‘बेस्ट स्टॅमिना’ म्हणून तृषा रोशन उराडे आणि ‘बेस्ट अट्रॅक्शन ऑफ ग्राउंड’ म्हणून जतीन रामचंद्र धोटे व अनुष्का माणूसमारे यांना गौरविण्यात आले. याशिवाय, संवाद प्रतिष्ठानतर्फे एक लाख रुपयांचे विशेष बक्षीस या वेळी प्रदान करण्यात आले.

या नेत्रदीपक सोहळ्याला काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बक्षीस वितरण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment