चंद्रपुरात भाऊचा दांडिया २०२६ उत्सवाचे पोस्टर

चंद्रपुरात ११ ऑक्टोबरपासून ‘भाऊचा दांडिया २०२६; दांडियात लाखोंची बक्षिसे, रिल्स स्पर्धाही होणार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 10, 2026

चंद्रपूर : भाऊचा दांडिया २०२६ या भव्य रास नृत्य उत्सवाचे आयोजन चंद्रपुरात करण्यात आले आहे. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव होत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मुख्य आयोजनाखाली हा कार्यक्रम ११ ते २० ऑक्टोबर २०२६ दरम्यान रोज सायंकाळी ७ ते १० वाजता चालेल. ठिकाण तुकूम रोडवरील पोलीस फुटबॉल ग्राउंड आहे. स्पर्धकांसाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. रिल्स स्पर्धा, लाईव्ह फूड स्टॉल्स आणि प्रेक्षकांसाठी दैनंदिन बक्षिसेही असतील. (चंद्रपूर जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीमध्ये केशर आंब्याची लागवड, वाचा हि बातमी)

भाऊचा दांडिया २०२६ कधी आणि कुठे होणार?

मराठा चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात ‘भाऊचा दांडिया २०२६’ या भव्य रास नृत्य व दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मुख्य आयोजनाखाली हा उत्सव पार पडणार असून, “रास नृत्याचा घुमणार नवा सूर, उत्साहात थिरकणार संपूर्ण चंद्रपूर” या संकल्पनेसह चंद्रपूरकरांना दांडियाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.

हा भव्य उत्सव येत्या ११ ऑक्टोबर २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७:०० ते १०:०० वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे ठिकाण पोलीस फुटबॉल ग्राउंड, ट्रॅफिक ऑफिसच्या बाजूला, तुकूम रोड, चंद्रपूर हे असणार आहे. नवरात्रीच्या या पावन पर्वात चंद्रपूर आणि परिसरातील सर्व गरबा प्रेमींसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सहभागी होणाऱ्या आणि उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या स्पर्धकांसाठी लाखोंची बक्षीसे व आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, कार्यक्रमात विशेष रिल्स स्पर्धा, खवय्यांसाठी लाईव्ह फूड स्टॉल्स तसेच प्रेक्षकांना दररोज आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देखील उपलब्ध असणार आहे.चंद्रपूर शहर व परिसरातील सर्व नागरिक, युवक-युवती आणि गरबा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक खासदार प्रतिभा धानोरकर, मराठा चॅरिटेबल ट्रस्ट व बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment