चंद्रपूर : Chandrapur Dahihandi Festival अत्यंत उत्साहात पार पडला. न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर हा भव्य उत्सव रंगला होता. ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ मित्र परिवार’ यांनी याचे आयोजन केले.
या चुरशीच्या स्पर्धेत बाबुपेठच्या शीतल माता गोविंदा पथकाने बाजी मारली. त्यांनी १,५१,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक जिंकून सलग दुसऱ्यांदा नवा विक्रम प्रस्थापित केला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित राहून विजेत्यांचे कौतुक केले. (हे हि वाचा – चंद्रपुरात गुणवंत व आदर्श नागरिकांचा सन्मान सोहळा संपन्न)
Chandrapur Dahihandi Festival: बाबुपेठच्या शीतल माता पथकाचा नवा विक्रम
‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ मित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या भव्य दहीहंडी महोत्सवात ‘शीतल माता गोविंदा पथक, बाबुपेठ’ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तुंग मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडून १,५१,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले आणि एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केला. यावेळी विशेष उपस्थित असलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी, प्रशासनाच्या सूचनेनुसार आणि नियमांचे पालन करून डीजे वाजवल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले; तसेच आगामी काळात येणाऱ्या सर्व सण-उत्सवांमध्येही सर्व नागरिकांनी व मंडळांनी अशाच प्रकारे प्रशासकीय नियमांचे पालन करून डीजे वाजवावा, असे महत्त्वपूर्ण आवाहन केले.
या सोहळ्याला राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, वरोरा नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, मूल नगराध्यक्षा एकता समर्थ, बल्लारपूर नगराध्यक्षा अल्का वाढई, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदा जेणेकर, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा राव, चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे कॉँग्रेसचे गटनेते सुरेंद्र अडबाले, चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे नगरसेवक तसेच सर्व नगर परिषदेचे नगरसेवक, यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिलांच्या थरारक रस्सीखेच स्पर्धेत ‘टग ऑफ वॉर’ संघ ठरला विजेता
उत्सवांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १८ वर्षांवरील महिलांच्या थरारक रस्सीखेच स्पर्धेने झाली. यामध्ये महिला संघांनी आपल्या ताकदीचे व संघभावनेचे प्रदर्शन घडवत प्रेक्षकांची दाद मिळवली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक टग ऑफ वॉर १०,००० व चषक द्वितीय क्रमांक ‘इरई’ ७,००० तसेच चषक आणि तृतीय क्रमांक ‘आझाद गोल्डन’ ५,००० व चषक यांनी पटकावला. त्यानंतर ५ ते १० वर्षे वयोगटातील चिमुकल्यांसाठी ‘भारतातील थोर महापुरुष’ या विषयावर आधारित वेशभूषा स्पर्धा पार पडली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांसारख्या विविध महापुरुषांच्या रुपात सजलेल्या बालगोपाळांमधून शिफा पवार हिने प्रथम ५,००० व चषक, संजीवन पवार याने द्वितीय ३,००० व चषक तर अहिल्या लालसरे हिने तृतीय क्रमांक २,००० व चषक पटकावला.
सलग दुसऱ्या वर्षी पटकावले १,५१,००० रुपयांचे प्रथम बक्षीस
संध्याकाळी संपूर्ण उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली सर्वांसाठी खुली ‘भाऊंची दहीहंडी’ स्पर्धा अत्यंत रंगतदार वातावरणात पार पडली. गोविंदा पथकांच्या उत्तुंग मानवी मनोऱ्यांनी आणि ‘गोविंदा आला रे’च्या गजराने न्यू इंग्लिश शाळेचे मैदान दुमदुमून गेले होते. या चुरशीच्या स्पर्धेत ‘शीतल माता गोविंदा पथक, बाबुपेठ’ यांनी थरारक मनोरे रचून दहीहंडी फोडली आणि १,५१,००० रोख व भव्य चषकाचा बहुमान पटकावला; विशेष म्हणजे या मंडळाने सलग दुसऱ्यांदा ही दहीहंडी फोडून एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. विजेत्या सर्व खेळाडूंचा व गोविंदा पथकांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देऊन गौरव करण्यात आला.
दरम्यान, या महोत्सवाच्या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक व न्यायालयाच्या नियमांनुसार आणि दिलेल्या सूचनेनुसार डीजे वाजवण्यात आला. यासंदर्भात बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आयोजकांच्या नियमपालनाचे कौतुक केले; तसेच आगामी काळात येणाऱ्या सर्व सण-उत्सवांमध्येही सर्व नागरिक व मंडळांनी अशाच प्रकारे प्रशासकीय नियमांचे पालन करून डीजे वाजवावा, असे महत्त्वपूर्ण आवाहन केले. या भव्य सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाला चंद्रपूर शहर व परिसरातील नागरिकांनी, महिलांनी आणि गोविंदा प्रेमींनी अभूतपूर्व प्रतिसाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘बाळूभाऊ मित्र परिवार’च्या सर्व सदस्यांनी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, तर शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांचे व सहभागी स्पर्धकांचे आभार अतुल वाघमारे यांनी आले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






