चंद्रपूर केशर आंबा लागवड उपक्रमात भेंडवी येथे कलम लावताना जिल्हाधिकारी वसुमना पंत

चंद्रपूर जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये केशर आंब्याची लागवड; राजुऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 10, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर केशर आंबा लागवड उपक्रमाला जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी राजुरा तालुक्यातील भेंडवी येथे कलम लावून जिल्हास्तरीय शुभारंभ केला. ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आणि हरित आच्छादन वाढावे, हा यामागचा उद्देश आहे. उपक्रमासाठी व्हीबीजी-राम-जी योजना आणि जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान निधी यांचा अभिसरणातून वापर केला जात आहे. यासाठी ३५ हजार दर्जेदार कलमे दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातून मागवण्यात आली आहेत. (बल्लारपुरात पिकाच्या नुकसानीची पाहणी, वाचा हि बातमी)

चंद्रपूर केशर आंबा लागवड : ५० ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी उपक्रम

जिल्हाधिकारी वसुमना पंत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्व विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावून केशर आंब्याची लागवड केली.

कोकण कृषी विद्यापीठाकडून ३५ हजार कलमे; शास्त्रज्ञांचे प्रशिक्षण

कोकण कृषी विद्यापीठाकडून 35 हजार दर्जेदार कलमे : या मोहिमेसाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून खास 35 हजार उच्च दर्जाची केशर आंबा कलमे मागवण्यात आली. आंबा कलमांची लागवड शास्त्रीय पद्धतीने व्हावी, यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल दडमल यांनी स्वतः चंद्रपुरात उपस्थित राहून ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना व कर्मचाऱ्यांना आंबा लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आणि संगोपनाबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले.

दुष्काळ निवारणासाठी श्रमदानातून वनराई बंधारा : केवळ वृक्षारोपणावर न थांबता जलसंधारणाची सांगड घालण्यासाठी राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भागवत रजेवाड यांच्या आवाहनावरून पंचायत समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त श्रमदान केले. या श्रमदानातून दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनेचा भाग म्हणून कार्यक्रमस्थळी वनराई बंधारा उभारण्यात आला, ज्यामुळे भूजल पातळी वाढून लागवड केलेल्या कलमांनाही लाभ होणार आहे.

यावेळी व्हीबीजी-राम-जी प्रकल्पाचे उपजिल्हा समन्वयक गिरीश धायगुडे, राजुराचे तहसीलदार ओमप्रकाश गोंड, गटविकास अधिकारी भागवत रजेवाड, कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल दडमल, कृषी अधिकारी महेश वट्टी, सहायक प्रकल्प अधिकारी हेमंत येरमे यांच्यासह भेंडवीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment