Ballarshah Yuvasena Adhava Baithak

बल्लारशात युवासेना आक्रमक: स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी आंदोलनाचा इशारा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 11, 2026

बल्लारशा : Ballarshah Yuvasena Adhava Baithak उत्साहात पार पडली. या आढावा बैठकीत स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा गाजला.

युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे यांनी प्रशासनाला इशारा दिला. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

तालुका समन्वयक प्रशांत गद्दाला यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. आगामी काळात संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. (हे हि वाचा – एकाच कुत्र्याने घेतला ५२ जणांना चावा)

युवासेना तालुका समन्वयक प्रशांत गद्दाला यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत तालुक्यातील युवासेनेच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे मैदानात उतरण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

स्थानिकांच्या हक्काच्या रोजगारासाठी आक्रमक पाठपुरावा

यावेळी मार्गदर्शन करताना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे यांनी स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले की, बल्लारशा तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, खनिज संपत्ती आणि विविध प्रकल्प असतानाही स्थानिक युवकांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची वेळ येत असेल, तर ही गंभीर बाब आहे. स्थानिकांच्या हक्काचा रोजगार बाहेरच्या लोकांना देण्याचा प्रकार युवासेना कदापि सहन करणार नाही.

स्थानिक युवकांना प्रथम प्राधान्य देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी युवासेना प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडे ठामपणे पाठपुरावा करणार आहे. गरज पडल्यास युवकांच्या रोजगाराच्या हक्कासाठी आंदोलनाची भूमिका घेण्यासही युवासेना मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा विक्रांतभाऊ सहारे यांनी दिला.

तालुक्यातील गोरगरीब नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि बेरोजगार युवकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी युवासेना अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शिक्षण, रोजगार, शासकीय योजना, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच युवकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधून ठोस उपाययोजना करण्यासाठी युवासेना सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्याचे काम युवासेना करेल. युवकांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे, हीच युवासेनेची भूमिका आहे, असे विक्रांतभाऊ सहारे यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावात युवासेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देण्यात आला. युवकांना मोठ्या प्रमाणात संघटनेशी जोडून त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच आगामी काळात विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर आंदोलने, निवेदने आणि जनजागृती उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

युवासेना तालुका समन्वयक प्रशांत गद्दाला यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटना तळागाळापर्यंत पोहोचवून युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

यावेळी शहर समन्व्यक,सोनू श्रीनिवास्व निखिल मेकेलवार, गौरव नाडंमवार, केतन दयालवार, , परिष महाजनवार, बालू वासेकर, करण हरकावत, महेश गुल्ला यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment