Bhadravati House Theft Chandrapur LCB Police Recover Gold

भद्रावतीत ३ लाखांचे सोने गायब; चंद्रपूर एलसीबीने कसा लावला सुगावा?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 11, 2026

चंद्रपूर / भद्रावती: Bhadravati House Theft Chandrapur प्रकरणी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा आणि वरोरा उपविभाग पथकाने मोठी कारवाई केली आहे. भद्रावती शहरात घर बंद असल्याचा फायदा घेऊन आलमारीतील दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपींकडून ३ लाख ४ हजार ८६५ रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील एक मुख्य साथीदार अद्याप फरार आहे. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.(हे हि वाचा – चंद्रपुरात क्रूरतेची सीमा, बापाने केली ८ वर्षीय मुलाची हत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती येथील रहिवासी फिर्यादी सौ. अंकिता पडधरीया यांचे पती व भाऊ कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे त्या ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे मुक्कामी गेल्या होत्या. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात भामट्याने घराचे आणि आलमारीचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवली. दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस येताच फिर्यादीने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अप.क्र. ७४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५ नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि उपविभाग वरोरा पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयावरून पोलिसांनी चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प शामनगर येथील रहिवासी अतुल विकास राणा (वय २७ वर्षे), पंचशील चौक येथील अथर्व सुभाष रामटेके (वय २१ वर्षे) आणि अनिकेत मनोज मेंढे (वय १८ वर्षे) या तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी या घरफोडीची कबुली दिली.

पोलीस पथकाने आरोपींकडून सोन्याची अंगठी, सोन्याचा गोप आणि सोन्याची लगड असा एकूण ३ लाख ४ हजार ८६५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तनवीर बेग (रा. चंद्रपूर) हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि वरोरा उपविभागाच्या पथकाने पार पाडली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment