Maharashtra labor registration centers । ⚠️ "खाजगी दलालांपासून सावध! कामगार नोंदणीसाठी फक्त या अधिकृत केंद्रांशीच संपर्क करा!"
Maharashtra labor registration centers । ⚠️ "खाजगी दलालांपासून सावध! कामगार नोंदणीसाठी फक्त या अधिकृत केंद्रांशीच संपर्क करा!"
January 17, 2026byPrakash Hande
Maharashtra labor registration centers
Maharashtra labor registration centers : चंद्रपूर - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ, हे संगणकीकृत प्रणालीव्दारे अदा केले जातात. अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांची छाननी / तपासणीअंती सदरचे लाभ हे थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येते. construction workers welfare schemes
मात्र सदरची कामे करून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी अशा आमिष अथवा दबावास बळी पडू नये. अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा.
कामगारांना नोंदणी, नुतणीकरण तसेच विविध योजने अंतर्गत लाभाचे अर्जाबाबत काही शंका /अडचण असल्यास खालील तालुका सुविधा केंद्राशी संपर्क साधावा.
Leave a Comment