heroic police action during monsoon flood : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मागील २ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील धरण, नदी व नाल्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. २३ जुलै रोजी विरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजा वरुर ते विरूर मार्गावरील नाल्याला पूर आल्याने दोन महामंडळ बस चिचबोर्डी, सिरशी गावाजवळील मार्गावर सायंकाळ पासून अडकल्या होत्या, विशेष म्हणजे बस मध्ये तब्बल ५० नागरिक ज्यामध्ये २५ ते ३० विद्यार्थी होते.
चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट
विरूर पोलिसांना सदर माहिती प्राप्त होताच सहायक पोलीस निरीक्षक संतोष वाकडे हे तात्काळ पोलीस स्टाफसह नाल्याजवळ पोहोचले. परिस्थिती बघता आधी सर्व विद्यार्थ्यांना पाणी व नाश्त्याची व्यवस्था केली, ठाणेदार वाकडे यांनी नागरिक व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. तब्बल अडीच तास वाट बघितल्यावर पुराचा प्रवाह कमी झाला. Virur police station flood rescue operation
पोलिसांनी शासकीय वाहन दोन्ही बसच्या पुढे लावत अडकलेल्या विद्यार्थ्यांना ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढले , विशेष बाब म्हणजे पोलिसांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना डोंगरगाव, सूबई, कवींडपेठ व चिंचोली या गावात घरी सुखरूप पोहचविले. पोलिसांची हि मोहीम रात्री १२ वाजेपर्यंत सुरु होती.
सदरची यशस्वी कामगिरी विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि संतोष वाकडे यांच्या नेतृत्वात परि. पोउपनि दत्ताहरी जाधव, विजय मुंडे, राहुल वैद्य, हर्षल लांडे, हर्षल चौधरी, बिभीषण खटके, सौरव पगडपेल्लीवार व संजय कोडापे यांनी केली.

पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले कि पावसाळ्यात पाणी साचलेल्या भागात जाणे टाळावे, विद्युत उपकरणापासून दूर रहा, पाणी वाहत असलेल्या पुलावरून जाऊ नका, पूर परिस्थितीत किंवा आपात्कालीन परिस्थितीत ११२ वर कॉल करा.
Leave a Comment