मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू असताना आणि शिंदे गटाकडून बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा होत असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपली BJP MLC Candidates ची यादी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अनेक बड्या नेत्यांची नावे शर्यतीत असताना पक्षाने यावेळी निष्ठावान आणि संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले आहे.
पक्षाने आपल्या जुन्या कार्यपद्धतीनुसार 'सरप्राइज' देत खालील नावांची घोषणा केली आहे:
माधवी नाईक: ठाणे जिल्ह्यातून आणि महिला आघाडीतून अनेक वर्षे पक्षाचे काम पाहणाऱ्या माधवी नाईक यांना संधी देऊन पक्षाने महिला नेतृत्वावर विश्वास टाकला आहे.
विवेक कोल्हे: विधानसभा निवडणुकीवेळी कोल्हे कुटुंबाला देण्यात आलेला शब्द पाळत भाजपने स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांना मैदानात उतरवले आहे.
प्रमोद जठार: कोकण पट्ट्यातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अनुभवी नेते प्रमोद जठार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
संजय भेंडे: पक्षासाठी सातत्याने सक्रिय असलेल्या संजय भेंडे यांनाही उमेदवारी मिळाली आहे.
सुनील कर्जतकर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आणि संघटनेत पकड असलेले कर्जतकर यांना संधी देऊन भाजपने आपल्या केडरला सुखद धक्का दिला आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या Pradnya Rajeev Satav यांना भाजपने तातडीने न्याय दिला आहे. विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांचे नाव जाहीर करून पक्षाने बाहेरून आलेल्या नेत्यांचाही सन्मान राखला आहे.
या निवडणुकीसाठी भाजपमधील अनेक ज्येष्ठ आणि वजनदार नेते इच्छुक होते. हायकमांडच्या भेटीगाठीही घेतल्या जात होत्या, मात्र पक्षाने प्रस्थापित नेत्यांऐवजी संघटना वाढीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिल्याने राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय मांडणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Leave a Comment