Well Body Found । २ दिवसापासून बेपत्ता महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह

April 28, 2026 by Prakash Hande

Well Body Found : कोरपना - कोरपना तालुक्यातील आवाळपूर शेतशिवारात विहिरीत एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिला आवाळपूर येथील सुरेखा कन्नाके (वय अंदाजे 65 वर्षे) असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले.  (आमरण उपोषणाला तात्पुरती स्थगिती)

 

आज सकाळी गोंडे यांच्या शेतातील विहिरीत हा मृतदेह आढळून आला. शेतमालकाने तात्काळ गडचांदूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. हा मृतदेह दोन दिवसांपूर्वीपासून विहिरीत असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला ओळख पटविणे कठीण झाले होते. मात्र तपासाअंती हा मृतदेह सुरेखा कन्नाके यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

 

मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, घरी झालेल्या वादातून सुरेखा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे चर्चा आहे, २ दिवसापासून त्या घरी नसल्याने कुटुंबातील एकही सदस्याने त्यांच्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही.  गडचांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

+