Chandrapur Breaking News : चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका महापौर वाद सुरु असताना कांग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज मातोश्री गाठत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत महापौर अडीच वर्षे तुमचा व अडीच वर्षे आमचा असा प्रस्ताव ठेवण्यात आला, यावर सकारात्मक चर्चा झाली असून आज सायंकाळी याबाबत निर्णय होणार आहे. (महाविकास आघाडीच्या घटकपक्षावर माझा विश्वास - खासदार धानोरकर)
चंद्रपूर मनपा निवडणुकीत कांग्रेस पक्षाला २७, भाजप २४, शिवसेना-वंचित ८ तर ५ अपक्ष, १ एमआयएम, एक बसपा असे संख्याबळ आहे, कांग्रेस भाजपला बहुमतासाठी ३४ चा जादुई आकडा गाठणे महत्वाचे आहे, मात्र कांग्रेस पक्षात सुरु असलेली अंतर्गत कुरघोडी मुळे धानोरकर-वडेट्टीवार सध्या आपल्या पक्षातील नगरसेवकांची पळवापळवी करीत आहे. यावर भाजप पक्षाने संधी साधत महापौर आमच्या पक्षाचा होणार अशी चर्चा सुरु केली.
आज आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावर लवकर तोडगा निघावा यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या चर्चेत वडेट्टीवार यांनी अडीच वर्षे महापौर पदाचा फॉर्म्युला सुचविला. चर्चेदरम्यान चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे उपस्थित होते. अडीच वर्षे महापौर कांग्रेस पक्षाचा तर अडीच वर्षे शिवसेनेचा यासोबत अडीच वर्षे स्थायी समिती अध्यक्ष दोन्ही पक्षाकडे असणार यावर सकारात्मक चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये पार पडली. दोन्ही पक्षातून प्रथम महापौर शिवसेनेचा कि कांग्रेस चा यावर आज निर्णय होणार असून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्याशी निर्णयात्मक चर्चा होणार आहे. चंद्रपूर महानगरपालिका मध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही चंद्रपूरच्या जनतेला ५ वर्षासाठी स्थायी सरकार देऊ अशी प्रतिक्रिया आमदार वडेट्टीवार यांनी दिली. भाजपचा महापौर होणार हि केवळ नेत्यांद्वारे करण्यात येणारी हवाबाजी आहे असा टोला वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपवर मारला.
Leave a Comment