चंद्रपूर सेक्स रॅकेट: लॉजिंगच्या आड सुरू होता देहव्यापार, पिता-पुत्राचा कारनामा उघड

May 17, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात देहव्यापाराचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे, चंद्रपूर पोलिसांनी ब्रह्मपुरी, चिमूर व चंद्रपूर शहरात सुरु असलेल्या देहव्यापारावर छापेमारी केली. याप्रकरणी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चिमूर शहरात वनिता बिअर बार मध्ये देहव्यापार, पोलिसांची छापेमारी)

 

१६ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती कि वडगाव मधील रिलॅक्स हॉटेल मध्ये देहव्यापार सुरु आहे, रिलॅक्स हॉटेल मध्ये लॉजिंगच्या आड हा धंदा सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून या व्यापाराचा पर्दाफाश केला.

 

रिलॅक्स हॉटेलमध्ये ७४ वर्षीय आरोपी सावजी पांडुरंग हस्तक व पाहिजे आरोपी ३० वर्षीय प्रदीप सावजी हस्तक हे दोघे पिता पुत्र दोन ते ३ महिलांकडून देहव्यापाराचा धंदा करीत होते. गुन्हे शाखेने या प्रकरणी मोबाईल, रोख रक्कम, कंडोम बॉक्स, रजिस्टर, क्यूआर कोड असा एकूण ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २ महिलांची सुटका करीत आरोपी हस्तक पिता-पुत्रावर रामनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, चेतन गज्जलवार, दीपक डोंगरे, कार्तिक खनके, किशोर वाकाटे, प्रफुल्ल गारघाटे, सुमित बरडे, छाया निकोडे, निराशा तितरे, विजयमाला वाघमारे, अपर्णा मानकर, प्रमोद डंभारे, मिलिंद टेकाम व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष, सायबर पोलिसांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.      

 

Leave a Comment

+