महाविकास आघाडीमधील घटक पक्षांवर माझा विश्वास - खासदार धानोरकर

January 26, 2026 by Prakash Hande

Chandrapur Mayor Suspense : चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका मध्ये महापौर कोण होणार यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे? महापौर पदाबाबत संभ्रमाची स्थिती शिवसेना-वंचित आघाडी गटामुळे होत आहे, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष शिवसेना उबाठा ने चंद्रपूर मनपा निवडणुकीत ६ जागांवर विजय मिळविला, या निवडणुकीत शिवसेना व वंचित आघाडीने युती करीत निवडणूक लढवली होती. दोन्ही पक्षांनी ८ जागेवर विजय मिळवीत, गट स्थापन केला आहे. आज २ अपक्ष नगरसेवक सह तब्बल १० नगरसेवक असून हा गट चंद्रपूरच्या राजकारणात किंगमेकर च्या भूमिकेत आहे. ह्या गटामुळे कांग्रेस व भाजप पक्षाचा महापौर मनपामध्ये बसू शकतो मात्र महापौर आमचा अशी अट घातल्याने भाजप व कांग्रेसची सध्या तरी गोची झाली आहे. (कांग्रेस पक्षाची सत्ता जाणार, भाजपचा महापौर बसणार)

भाजप वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे मात्र कांग्रेस पक्ष अंतर्गत राजकीय कुरघोडीमुळे स्वतःच्या अस्तित्वाशी लढत आहे. वडेट्टीवार-धानोरकर संघर्षाने सत्ता कुणाची हे अजूनही स्पष्ट झाले नाही, दोन्ही नेते कांग्रेस पक्षाचे नगरसेवक स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न सध्यातरी करीत आहे. २६ जानेवारीला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महापौर पदाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले कि शिवसेना उबाठा हे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत असेल तर त्यात काही गैर नाही, महाविकास आघाडीमधील घटकपक्ष शिवसेना आहे त्यामुळे ते आम्हाला पाठिंबा देणार मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, पाठिंबा मिळाली कि मनपामध्ये महापौर हा कांग्रेस पक्षाचा असेल. Chandrapur Mayor Suspense

कांग्रेस व भाजप पक्षाला पराभवाची धूळ चारत शिवसेना व वंचित ने एकूण ८ नगरसेवक निवडून आणले, शहराच्या विकासाकरिता आपल्याला सत्तेत वाटा मिळावा यासाठी शिवसेना-वंचित गट प्रयत्नरत आहे. सध्या कांग्रेस पक्षाजवळ अपक्ष मिळून एकूण ३० जागा आहे, बहुमतासाठी केवळ ४ जागेची गरज आहे, हि गरज शिवसेना-वंचित पूर्ण करू शकतो मात्र कांग्रेस पक्षाचे अंतर्गत कलहामुळे २ गट निर्माण झाले आहे. त्यामुळे कांग्रेस कांग्रेससोबत लढत आहे. बहुमताच्या जवळ असताना सुद्धा कांग्रेस पक्षाचा महापौर मनपात विराजमान झाला नाही तर चंद्रपूर मनपाच्या इतिहासात पहिल्यांदा कांग्रेस पक्षाने कांग्रेस पक्षाला हरविले असा संदेश राजकीय क्षेत्रात जाणार हे नक्की.

Leave a Comment

+