Chandrapur Corporation Politics : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत कांग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, सत्तास्थापनेसाठी कांग्रेस पक्षाला केवळ ७ नगरसेवकांचा पाठिंबा हवा मात्र कांग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे सत्ता मिळणार नाही असे चित्र सध्या चंद्रपूरच्या राजकारणात निर्माण झाले आहे. शिवसेना ठाकरे-वंचित गटाकडे ८ नगरसेवक आहे त्यांना २ अपक्ष उमेदवारांची साथ मिळाली असून आता शिवसेना-वंचित च्या गटात १० नगरसेवक झाल्याने कांग्रेसचे चांगलीच धाकधूक वाढली आहे. वडेट्टीवार-धानोरकर यांच्या संघर्षातून वडेट्टीवार यांनी प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने पाऊले मागे घेत आता सत्तेची जुळवाजुळव खासदार धानोरकर यांच्या हाती असल्याची माहिती दिली. (महापौर खासदार धानोरकरांना आपल्या मनाप्रमाणे हवा - आमदार वडेट्टीवार)
२७ नगरसेवक असलेल्या कांग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोडी झाल्याने सत्तास्थापनेत कांग्रेस नेत्यांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहे. भाजप नेते आमदार मुनगंटीवार आधीपासून महापौर आमचा होणार अशी प्रतिक्रिया देत होते, भाजपला केवळ १० नगरसेवकांची गरज आहे, चंद्रपूर मनपात महापौर कोणत्या पक्षाचा बनेल हे सर्व शिवसेना-वंचित गटावर अवलंबून आहे, जो आम्हाला महापौर पद देणार आमचा पाठिंबा त्या पक्षाला राहणार अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केली आहे, याबाबत वंचित चे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी १० नगरसेवकांनी चंद्रपुरातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली असता महापौर कोणत्या पक्षाचा बसवायचा व पाठिंबा कुणाला द्यायचा याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशी चर्चा झाल्याची माहिती आहे.
कांग्रेस पक्षातील अंतर्गत कुरघोडी मुळे सत्तेच्या जवळ आलेल्या पक्षाला वंचित राहण्याची वेळ आली आहे. कांग्रेस पक्षात सध्या नगरसेवकांची पळवापळवी सुरूच आहे. यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसणार अशी स्थिती सध्यातरी आहे. येणाऱ्या २ ते ३ दिवसात याबाबत शिवसेना-वंचित गट अधिकृतपणे कांग्रेस किंवा भाजपला पाठिंबा देणार आहे.
Leave a Comment