Chandrapur bus stand accident चंद्रपूर शहरातील मुख्य बसस्थानकात प्रवेश करत असलेल्या बसच्या चाकाखाली आल्यामुळे एक ऑटोचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज, रविवार दुपारी सुमारे १२.१० वाजता घडली. गंभीर जखमी झालेल्या ऑटोचालकाचे नाव नानाजी मेश्राम (वय ५७), रा. बाबूपेठ असे आहे. state transport bus accident
चंद्रपुरातील भाजप भवनासाठी आमदार जोरगेवार देणार 1 एकर जमीन
चंद्रपूर हे जिल्हा मुख्यालय असल्याने येथे राज्यातील अनेक शहरांमधून एसटी बसांचे नियमित आगमन असते. या पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून १२.०७ कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांनी सुसज्ज बसस्थानकाचे बांधकाम करण्यात आले आहे. बसस्थानकाच्या बाहेर ऑटो पार्किंगसाठी आणि प्रवाशांना घेण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ऑटोस्टँड उभारले आहे. या ऑटोस्टँडवर ऑटोचालक आपली वाहने लावून, आपला नंबर आल्यावर प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थळी नेतात.

आज दुपारी नागपूर इमामवाडा डेपोची शिवाई-ई बस (क्रमांक MH 49 Z 4668) नागपूर येथील चालक सुरज नेवारे बसस्थानकात प्रवेश करत असताना प्रवेशद्वाराबाहेर ही दुर्घटना घडली. बसचा पुढचा उजवा चाक मेश्राम यांच्या पायावरून गेल्यामुळे त्यांच्या जांघेपासून पायापर्यंत गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमीला रुग्णालयात रवाना केले. auto rickshaw accident news

घटनास्थळी उपस्थित इतर ऑटोचालकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. बसस्थानकातील वाहतुकीच्या अयोग्य नियोजनामुळे हे अपघात घडत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी असेही सांगितले की, संबंधित बस चालक खूप वेगात बस घेऊन येत होता, त्यामुळे मेश्राम यांचा पाय चाकाखाली आला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बसचालक सुरज नेवारे यांना रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्यांनी तिथे अपघाताची नोंद केली.
– अंकुश खाडिलकर,
डिपो मॅनेजर, चंद्रपूर डिपो
Leave a Comment