Rajmata Hirai Statue : चंद्रपूर - महाराणी राजमाता हिराई यांच्या पुतळा उभारणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली असून आदिवासी संघटना तसेच भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर यांच्या वतीने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना सदर पुतळा उभारणसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. (चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाची अवस्था बघून संतापल्या खासदार धानोरकर)
यावेळी भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडीचे अध्यक्ष तथा नगर सेवक जितेश कुळमेथे, नगर सेविका सरला कुळसंगे, जनसेवा गोंडवाना पार्टीचे धीरज शेडमाके, गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे सारंग कुमरे, आक्रोड संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय कुमरे, अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा मसराम, आदिवासी टायगर सेना जिल्हा महासचिव अविनाश मडावी, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रवींद्र गुरुनुले, सविता दंढारे, बलराम डोडाणी, भाजप नेते प्रकाश देवतळे,युवा मनपा गटनेता शेखर शेट्टी, महामोर्चा महानगर अध्यक्ष मयुर हेपट, मंडळ अध्यक्ष स्वप्निल वाढई, राकेश नाकाडे आदिंची उपस्थिती होती.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चंद्रपूर जिल्ह्याला गोंड राजांचा समृद्ध इतिहास लाभला असून महाराणी राजमाता हिराई यांचे शौर्य आणि योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या स्मृती जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरात भव्य पुतळा उभारणे आवश्यक आहे.
या संदर्भात आ. किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत पुतळा उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने योग्य आणि मध्यवर्ती जागा उपलब्ध करून देत या कामाला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, नागरिकांना सहज भेट देता येईल अशा ठिकाणी पुतळा उभारण्यात यावा, जेणेकरून आदिवासी समाजाचा इतिहास व शौर्यगाथा अधिक प्रभावीपणे समाजासमोर येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Leave a Comment