सचिव व सरपंचांवर कारवाईची मागणी – गावठाण जमीन गैरव्यवहार

January 17, 2026 by Prakash Hande

Gavthan jamin registry : चंद्रपूर - साखरवाही ग्रामपंचायत अंतर्गत मालमत्ता क्रमांक ५०६ ही गावठाण जागा आहे. परंतु ही जागा ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवांनी संगनमताने सदस्यांना विश्वासात न घेता आणि बेकायदेशीरपणे व्यवहार करून संबंधित व्यक्तिच्या नावावर रजिस्ट्री केली आहे. त्यामुळे साखरवाही ग्रामपंचायत सदस्य विनोद खापने यांनी पत्रकार परिषदेत ही रजिस्ट्री रद्द करण्याची आणि यासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायत सचिव आणि सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २९८ ग्राम ब्राऊनशुगर जप्त

पत्रकार परिषदेत सांगितले की, साखरवाही ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ग्रामसभेत गावातील गावठाणच्या मोकळ्या जागेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. खटोड यांची ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात शेती आहे. त्यांच्या शेतीचा भाग गावठाण क्षेत्रात समाविष्ट आहे. गावातील गावठाण जागा शेतीसाठी किंवा इतर कोणत्याही व्यावहारिक कारणासाठी वापरता येत नाही. किंवा ती कोणालाही विकता किंवा बक्षिस म्हणून देता येत नाही. ती जमीन गावातील गरीब नागरिकांसाठी किंवा घरकुल योजनेसाठी वापरता येते. 

 

प्रस्ताव चर्चेसाठी आला नाही

ग्रामपंचायतीला याचा अधिकार आहे या सर्व गोष्टी सचिवांनी ग्रामसभेत सांगितल्या असे असूनही, मालमत्ता क्रमांक ५०६ धारक खटोड यांनी फेरफार करून चंद्रपूर येथील रहिवासी चांडक यांच्या नावावर गावठाण ची जागा रजिस्ट्री करून ती विकली. सभेतील काही सदस्यांना अंधारात ठेवून ते मंजूर ही करण्यात आले. ही बाब उघडकीस आल्यानंतर सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीत याबद्दल आक्षेप घेत अर्ज सादर केला. सभेत हा प्रस्ताव चर्चेसाठी आला नाही, उपसरपंच आणि तीन सदस्यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी न करता ही प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

 

प्रस्ताव बनावटी

ग्रामपंचायतमधील एकूण ९ सदस्यांपैकी फक्त ५ जणांनी स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे खापणे यांनी पत्रकार परिषदेत हा प्रस्ताव बनावटी असल्याचा आरोप केला. सदस्यांना त्याबद्दल कोणतीही माहिती न देता प्रस्तावावर सदस्यांचे नाव आणि स्वाक्षरी दाखविणे हा कायदेशीर गुन्हा आहे. खापने यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे की हे प्रकरण सरपंच आणि तत्कालीन सचिव यांच्या संगनमताने झाले आहे आणि बैठकीत पारदर्शकता न दाखवता बनावट कागदपत्रे तयार करून गावातील मालमत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.   Illegal land registration

 

 

या संदर्भात, ग्रामपंचायत सदस्य विनोद खापने यांनी ग्रामपंचायत बैठक क्रमांक ६ मध्ये घेतलेल्या ठराव क्रमांक ७, ७/१ आणि ८ ची सखोल चौकशी करावी, मालमत्ता क्रमांक ५०६ ची बेकायदेशीर नोंदणी त्वरित रद्द करावी आणि यासाठी जबाबदार सचिव आणि सरपंचांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पत्रपरीषदेत केली आहे.

 

Leave a Comment

+