Chandrapur District Police Force । 👮‍♀️ महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती; लाठी ठाण्यात नवा इतिहास!

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur District Police Force

Chandrapur District Police Force : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये पारदर्शकता राखत जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी उल्लेखनीय निर्णय घेतले आहेत. बदल्यांची ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय गरज म्हणून न करता, कार्यक्षमता आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर पार पाडली गेली आहे.

सिमेंट कंपनीचे आश्वासन फसवं, आमदार भोंगळे यांचं ठिय्या आंदोलन


याच पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भूते यांची लाठी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लाठी हे संवेदनशील व आंतरराज्य सीमेला लागून असलेले क्षेत्र असल्याने या भागात अनुभवी व जबाबदार अधिकारी म्हणून भूते यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे. SP initiatives for female police officers

निशा भुते यांच्याकडे नवी जबाबदारी


एपीआय निशा भूते या मागील वर्षभर राजुरा पोलीस ठाणे येथे कार्यरत होत्या. आपल्या कार्यशैलीमुळे आणि शिस्तप्रियतेमुळे त्यांनी स्थानिक नागरिकांमध्ये विश्वासार्हतेचं वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळेच त्यांच्या नव्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

https://youtu.be/qeug68ldQF4?si=JyIuwsYYSmZUt6Tc


जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी बदल्यांदरम्यान महिला अधिकाऱ्यांना सक्षम संधी देण्यावर विशेष भर दिला.या बदल्यांमुळे महिला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, पोलीस दलात न्याय आणि समानतेची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.लाठी सारख्या संवेदनशील भागात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती होणं हे पोलीस प्रशासनाच्या बदलत्या आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक मानले जात आहे.

Leave a Comment

+