female ganja peddlers । "महिला ‘गांजा पेडलर’ – चंद्रपूरच्या गुन्हेगारीत धक्कादायक वळण!"

January 17, 2026 by Prakash Hande

female ganja peddlers

female ganja peddlers : चंद्रपूर - चंद्रपूर सारख्या मागासवर्गीय जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एमडी, गांजा, सुगंधित तंबाखू हे पदार्थ सहजपणे उपलब्ध होऊ लागलेले आहे, मात्र पोलीस यंत्रणा यावर गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आता अंमली पदार्थाच्या विक्री मध्ये महिलांची एंट्री झाली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या २ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

१ किलो गांजा जप्त

१९ जुलै रोजी शहर पोलिसांना माहिती मिळाली कि दोन महिला राहत्या घरून गांजा विक्री करीत आहे, माहितीच्या आधारे पोलीस पथक भिवापूर वॉर्ड येथे एका घरी धाड मारली असता पोलिसांना १ किलो १५७.५ ग्राम गांजा किंमत १२ हजार रुपये आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी कुख्यात सराईत गुन्हेगार ३३ वर्षीय मुस्कान उर्फ स्नेहा उर्फ भारती सुरेश खैरे व ५५ वर्षीय पुष्पा पांडुरंग बानलवार यांच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली. drug arrest cases in Chandrapur

नेटवर्क तयार

चंद्रपूर जिल्ह्यात गांजा विक्री मध्ये महिलांचं नेटवर्क वाढत असल्याची माहिती असून महाविद्यालय व इतर ठिकाणी महिला व मुली या अंमली पदार्थ विक्री नेटवर्कचा भाग झाले आहे, सहसा मुली व महिलांवर संशय जात नसल्याने हा धंदा चंद्रपुरात जोमात सुरु आहे.

चंद्रपुरात मोरांची शिकार?

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, पोउपनि विलास निकोडे, पोउपनि तृप्ती खंडाईत, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंद खरवार, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदूरकर, सारिका गौरकार, दीपिका झिंगरे यांनी केली.

Leave a Comment

+