Chimur Crime News : चिमूर ४ जानेवारी - चिमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४ जानेवारी रोजी ३१ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद रित्या नेहरू शाळेजवळ पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आकाश प्रभाकर उताणे राहणार तनस कॉलनी ठक्कर वॉर्ड चिमूर असे मृतकाचे नाव होते. मृतकाच्या डोक्यावर जखम आढळून आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविल्यावर अवघ्या तीन तासात आरोपीना अटक केली. (अंतर्गत वादानंतर चंद्रपुरातील भाजप नेते एकत्र)
आकाश चा खून त्याच्या मित्रांनी केला, नेहरू शाळेजवळ आकाश हा दारू पीत बसला होता, काही वेळाने ३ युवक त्याठिकानाहून जात होते, आकाशने त्यांना बघून शिवीगाळी करणे सुरु केले, विशेष म्हणजे तिघेजण आकाशच्या ओळखीचे होते मात्र शिव्या सहन न झाल्याने त्यांच्यात वाद झाला, वाद विकोपाला गेल्यावर तिघांनी दगडाने आकाशच्या डोक्यावर वार करीत त्याला ठार केले.
पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत तपास सुरु केला, अधिक माहिती काढल्यावर आरोपींची ओळख पटली, पोलिसांनी २० वर्षीय सुजल विलास सोनावणे राहणार नेताजी वार्ड चिमूर, २७ वर्षीय छगन मोहन दिगोरे राहणार नेताजी वॉर्ड व २४ वर्षीय अनिकेत शेषराव साखरकर राहणार नेताजी वॉर्ड यांना अटक केली. आरोपींची गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी खुनाचा छडा अवघ्या तीन तासात लावत आरोपीना अटक केली. Chimur Crime News
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात सपोनि ताळीकोटे, पोउपनि देरकर, पोलीस कर्मचारी सचिन साठे, प्रमोद पडाल, प्रमोद पिसे, डोनू मोहुर्ले, सचिन खामनकर, रोहित तुमसरे, फाल्गुन परचाके, रुपेश शामकुळे, विकास बारसागडे, गणेश वाघ, सोनू येलकुचेवार यांनी केली.
Leave a Comment