high blood pressure awareness program 2025 : चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, डॉ. निखील भागवत उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाची अंमली पदार्थविरोधात मोहीम
यावेळी डॉ. चिंचोळे म्हणाले, उच्च रक्तदाब हा सर्वांसाठी हानीकारक आजार आहे. जास्त मीठ, चरबीयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न सेवन केल्याने तसेच मद्यपान, धुम्रपान तंबाखुयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब होतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक, किडनीचे आजार, पक्षाघात (लकवा) आणि डोळयाचे आजार होऊन अंधत्व येऊ शकते व इतर गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ. पद्मजा बोरकर यांनी केले. संचालन समुपदेशक रामेश्वर बारसागडे यांनी तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा तंबाखु नियंत्रण सल्लागार डॉ. स्वेता सावलीकर, अधिपरिचारीका माया आत्राम, पाठ्यनिर्देशिका प्रज्ञा अंबादे व रिना कन्नाके, सुविधा काकडे, स्टॉफ नर्स प्राची काहिलकर तसेच रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
Powered by myUpchar
डोकेदुखी, सतत किंवा तीव्र वेदना, छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा हदयाची धडधड होणे, चेहरा लाल होणे किंवा डोळे चमकणे, घाबरटपणा होणे इत्यादी आहेत. वरील प्रमाणे लक्षणे दिसून आल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालय किंवा खाजगी रग्णालयात तपासणी करून निदान करावे. silent killer high blood pressure symptoms
उच्च रक्तदाबाचे डॉक्टरांकडुन निदान झाल्यास डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नियमीतपणे औषधोपचार घेणे. तसेच आजारापासून दूर राहण्याकरिता नियमितपणे व्यायाम, जीवनशैलीत बदल करणे, तसेच ताणतणाव दूर करण्याकरिता दिनचर्यामध्ये गाणे ऐकणे, पेपर वाचणे, पोहणे, पायी चालणे, इत्यादी चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. how to control high blood pressure naturally
या वर्षाची थीम ‘तुमचा रक्तदाब अचुक मोजा, त्याला नियंत्रित ठेवा, दीर्घायुष्य जगा’ अशी आहे. उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर आहे. जोपर्यंत आपण तपासणी करत नाही, तोपर्यंत स्वतःला माहित पडत नाही. करिता 30 वर्षावरील सर्व व्यक्तिनी/नागरीकांनी आपल्या नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन रक्तदाब तपासणी करून घ्यावी.
Leave a Comment