boyfriend shares private video । प्रेमाचा सापळा! प्रियकराकडून खाजगी व्हिडिओ शेअर, चंद्रपूर पोलिसांची कारवाई

January 17, 2026 by Prakash Hande

boyfriend shares private video

boyfriend shares private video : चंद्रपूर / भिसी - भिसी पोलिसांनी एका तरुणाला बलात्कार आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. राकेश कैलास चौधरी (वय २२) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने एका १९ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत तीन वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर, त्याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर व्हायरल केले.

मनोरंजनाच्या नावावर जुगार क्लब, पोलिसांची धाड

तरुणीची बदनामी

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, राकेश चौधरी आणि तिच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात राकेशने तिचे अनेक अश्लील व्हिडिओ गुप्तपणे काढले. नंतर याच व्हिडिओंचा धाक दाखवून त्याने तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ९ ऑगस्ट रोजी त्याने हे व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करून तरुणीची बदनामी केली.

ही गोष्ट लक्षात येताच तरुणीने आपल्या कुटुंबियांसोबत भिसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार मंगेश भोंगाडे आणि त्यांच्या टीमने तात्काळ कारवाई करत आरोपी राकेशला अटक केली.

त्याच्यावर बलात्कार आणि ॲट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करत आहेत.

Leave a Comment

+