safety of Christian priests and pastors । ख्रिश्चन समाजाचा चंद्रपुरात भाजप आमदारविरुद्ध निषेध मोर्चा

January 17, 2026 by Prakash Hande

safety of Christian priests and pastors

safety of Christian priests and pastors : चंद्रपूर ३ जुलै - राज्याच्या राजकारणात सत्ताधारी मंत्री असो कि आमदार सध्या ते विविध जातीधर्माबाबत बेताल वक्तव्य करत सुटले आहे, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, यांच्यावर कठोर कारवाई करीत आमदारकी रद्द करण्याची मागणी चंद्रपूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली.

चंद्रपुरात डास नियंत्रण मोहिमेला सुरुवात

३ जुलै रोजी चंद्रपुरात संत अँड्रयूज चर्च ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ख्रिश्चन समुदायाने आमदार पडळकर विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर निषेध मोर्च्याचे आयोजन चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले होतेे. protests against politicians for hate speech

११ लाखांची सुपारी

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथे ऋतुजा राजगे नावाच्या गर्भवती तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात धर्मांतरासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मशाल मोर्चादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांनी “धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पाद्रींना सैराट करा, आणि जो हे करेल त्याला मी स्वतः ११ लाखांचे बक्षीस देईन” असे विधान केले. या वक्तव्याने ख्रिश्चन समाजात संताप आणि भय निर्माण झाले असून, त्यांनी याला हिंसाचाराला चिथावणी देणारे वक्तव्य ठरवले आहे. धर्मगुरूंना ठार मारणाऱ्याला पडळकर यांनी 11 लाखांची सुपारी देण्याचं काम केले.

चंद्रपुरात आयोजित निषेध मोर्च्यात आमदार पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, त्यांना आमदार पदावरून पदमुक्त करीत कारवाई करा अशी मागणी ख्रिश्चन समाजाने मोर्च्यात केली.

https://youtube.com/shorts/jjRT2HLZcZY?si=7HL7PO6junuAabRD

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निषेध मोर्चा पोहचल्यावर जिल्हाधिकारी गौडा यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पास्टर निर्मल यांनी सांगितले की जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधीने एखाद्या समाजाविरुद्ध असे बेताल वक्तव्य करणे म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होय. church protest march against political statements

https://youtu.be/qeug68ldQF4?si=oRza1M1rtsY2uqPI

आमच्या धर्मात येणारे नागरिकांना आमच्या धर्मात येण्यासाठी आम्ही जबरदस्ती करीत नाही, ज्यांना आमच्या धर्मात यायचे आहे ते स्वखुशीने येतात. पडळकर यांच्या या आक्षेपार्ह विधानाने ख्रिश्चन समाजात दहशत निर्माण झाली असून शासनाने आमच्या समाजाच्या रक्षणासाठी महत्वाचे पाऊले उचलत आम्हाला सुरक्षा प्रदान करावी व पडळकर यांच्यावर कठोर कारवाई शासनाने करावी अशी मागणी पास्टर्स यांनी केली. आयोजित निषेध मोर्चात हजारो ख्रिश्चन समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Comment

+