Indranil Naik Birthday : चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे संपर्कमंत्री मा. इंद्रनील नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ऊर्जानगर कोंढी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय सामग्री वाटप करण्यात आली. (चंद्रपूर महापौर पदाचा फॉर्म्युला ठरला, शिवसेना- कांग्रेस पक्षाला अडीच वर्षाची संधी)
केक कापून वाढदिवस साजरा करण्याच्या प्रवृत्तीला फाटा देत महापुरुषाचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून सदर उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, विधानसभा अध्यक्ष सुनिल भाऊ काळे, माजी सरपंच अमोल ठाकरे, सुजित उपरे, अमर गोमासे, रोशन फुलझेले, शुभम काळे, नामण पवार, पंकज ढेंगारे, अनुकूल खन्नाडे, नितीन घुबडे, वसंत भैय्या, नेहाल मुंगलमारे, सचिन मांडले, आसिफ पठाण, सौरभ घोरपडे, करण भालेराव, भोजराज शर्मा, पवन बंडीवार, संतोष ताजणे, सुमित मसराम, संकेत ठाकरे, आशिष ठक्कर यांचेसह शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
Leave a Comment