चंद्रपूर: 66 व्या महाराष्ट्र दिनी मनपा मुख्यालयात महापौरांकडून ध्वजारोहण

May 01, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर १ मे - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवार १ मे रोजी चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयात महापौर संगीता खांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (चंद्रपूर महापौरांना बरखास्त करा)


    याप्रसंगी आयुक्तांनी सर्व अधिकारी,कर्मचारी व शहरातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच शहराच्या विकासाकरीता राबणाऱ्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्राचे राज्यगीताचे सामुहिक गायन करण्यात आले. कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात येऊन महाराष्ट्राची गौरव गिते वाजविण्यात आली.

Chandrapur Maharashtra Day: आयुक्त, उपमहापौर उपस्थित

     याप्रसंगी उपमहापौर प्रशांत दानव,स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, मनपाचे मनपा आयुक्त अकुनुरी नरेश,उपायुक्त संदीप चिद्रवार, उपायुक्त शेषराव टाले, सर्व पदाधिकारी,मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे, नरेंद्र बोबाटे,डॉ.अमोल शेळके यांच्यासह सर्व कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.  

Leave a Comment

+