चंद्रपूर: शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, 95 लाख निधीतून भूमिपूजन संपन्न

May 01, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर -  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात अभिमानाची ज्वाला प्रज्वलित होते. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक व संस्कृतीसमृद्ध शहरात महाराजांचा सन्मानाने पुतळा उभा राहावाही प्रत्येक शिवप्रेमीची अनेक वर्षांपासून मनापासूनची इच्छा होती. हीच भावना ओळखून त्या स्वाभिमानाच्या दीपाला आज प्रत्यक्ष रूप देण्याचा ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांसमोर साकार होत असूनचंद्रपूरच्या भूमीत स्वाभिमानाचा दीप पेटणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. (म्हाडा च्या विकासासाठी १४४ कोटींचा निधी, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा)

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अश्वारूढ पुतळा साकारण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. सदर कामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला ९५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने येथे महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरावृक्षारोपणसौंदर्यीकरण व कोरीव कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 

या प्रसंगी पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईकेखासदार प्रतिभा धानोरकरजिल्हाधिकारी वसुमना पंतमहापौर संगीता खांडेकरमनपा आयुक्त अकनुरी नरेशउपमहापौर प्रशांत दाणव, विरोधी पक्षनेते राजेश अड्डूर, स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हेमनपा गटनेता शेखर शेट्टीसुभाष कासनागोट्टूवारतुषार सोमबलराम डोडाणीनामदेव डाहुलेरवी गुरनुलेदशरथ सिंग ठाकूरवंदना हातगावकरस्वप्नील डुकरेप्रदीप किरमेसारिका संदूरकर, राहुल पावडे, सैइदा ताजू शेख, शिला श्रीडाम, अनिल फुलझेलेप्रवीण गिलबिलेविनोद शेरकीप्रसाद जोरगेवारसुधीर कारंगलओमेश आयलूसुमित बेलेरामकुमार आकापेल्लीवारप्रलय म्हशाखेत्रीनगरसेवक संजय कंचर्लावारजितेश कुळमेथेभालचंद्र दाणवनगरसेविका पुष्पा उराडेशितल गुरनुलेसरला कुळसंगेआशा देशमुखज्योती जीवणेकौसर खानदिवाकर पुद्दटवारनकुल वासमवारराकेश नाकाडेप्रमोद शास्त्रकाररेश्मा पांडेशेखर देशमुखभाग्येश्री हांडे आदींची उपस्थिती होती.

Shivaji Maharaj Statue : हि अत्यंत वेदनादायी बाब 

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हतेतर ते आपल्या स्वाभिमानाचेपराक्रमाचे आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक आहेत. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात महाराजांविषयी अपार श्रद्धा आणि प्रेम आहे. एवढ्या मोठ्या महानगरपालिका क्षेत्रात आपल्या आराध्य दैवताचा पुतळा नसणे ही अत्यंत वेदनादायी बाब होती. ही केवळ कमतरता नव्हतीतर आपल्या भावना व्यक्त करण्याची एक अपूर्णता होती.

 

हीच खदखद मनात ठेवून चंद्रपूरमध्ये महाराजांचा सन्मानाने व अभिमानाने पुतळा उभा राहावाअसा संकल्प करण्यात आला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आलाप्रशासनासोबत अनेक बैठका घेण्यात आल्या तसेच विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पुतळ्यासाठी जागेचा प्रश्नही मोठा होतामात्र ती जागा महसूल विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून हा मार्ग मोकळा करण्यात आला.

 

आज उपलब्ध करून दिलेल्या ९५ लाख रुपयांच्या निधीतून या पवित्र कार्याची सुरुवात होत असल्याचा मनापासून आनंद आहे. हा पुतळा केवळ धातूचा नसूनतो आपल्या इतिहासाचाअस्मितेचा आणि संस्कारांचा जिवंत साक्षीदार ठरेल.

महाराजांचा आदर्श केवळ पुतळ्यात नव्हेतर आपल्या आचरणातही दिसला पाहिजे. त्यांच्या शौर्याचीन्यायप्रियतेची आणि लोकहिताची प्रेरणा आपण आपल्या जीवनात उतरवलीतरच या पुतळ्याला खऱ्या अर्थाने अभिवादन होईलअसे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment

+