Sunilkumar Nanhet MSEDCL : चंद्रपूर दि. २८ जानेवारी २०२६:- महावितरण मध्ये बल्लारशा विभागात कार्यरत श्री. सुनिलकुमार गणेश नन्हेट हे मुख्य तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून त्यांनी बॉडी बिल्डींग या खेळ प्रकाराचा वर्ष 2018 पासून सराव चालु केला. (उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू)
कोरोना काळात त्यांनी या खेळात प्राविण्य मिळविले. आज त्यांचे वय 56 वर्ष असून महावितरणच्या कामातून त्यांनी वेळ काढून 10 एप्रिल 2022 मध्ये पण आग्रा येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते. या वर्षी 25 जानेवारी 2026 मध्ये चेन्नई मध्ये होणाऱ्या स्पर्धेत भाग घेऊन 50+ या गटात सुवर्ण पदक मिळवले आहे.आज दिनांक 27.01.2026 रोजी मुख्य अभियंता श्री. हरिश गजबे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रपूर मंडळाच्या अधिक्षक अभियंता चिंवडे मॅडम तसेच उपमुख्य संबंध अधिकारी श्री. विशाल पिपरे उपस्थित होते.
Leave a Comment