चंद्रपूर - धानोरा परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत वर्धा नदीकाठी आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकीसह भाचीचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतकांच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. (वर्धा नदीत बाप लेक व भाचीचा बुडून मृत्यू)
राजू कोडापे (वय ४०), अर्तिता कोडापे आणि प्रियंका मडावी अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबीय वर्धा नदीकाठी आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली.
Chandrapur Drowning Tragedy: आमदार जोरगेवारांची भेट
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतकांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी त्यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली असून, शासनाकडूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी सरपंच विजय आगरे, उपसरपंच विनोद खेवले, राकेश पिंपळकर, करण नायर आदी उपस्थित होते.
Leave a Comment