Ajit Pawar Plane Crash बारामती - बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले, या अपघातात अजित पवार सह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. सदर विमान हे व्हीएसआर कंपनीचे होते. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना एका शेतात हे विमान कोसळल. या दुर्घटनेत विमान जळून खाक झाले. विमानातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला.
बारामती मध्ये आज अजित पवार यांच्या 4 प्रचार सभा होत्या, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईवरून बारामती मध्ये येत होते. या धक्कादायक घटनेमुळे राज्य हादरून गेले आहे. अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी राज्यभर पसरताच त्यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठा हादरा बसला आहे.
Leave a Comment