police action on tobacco : चंद्रपूर ८ एप्रिल - विदर्भात मोठ्या प्रमाणावर सेवन केला जाणारा खर्रा हा सुगंधित तंबाखू मिसळून तयार केला जातो. या तंबाखूचा अवैध व्यापार चंद्रपूर जिल्ह्यात जयसुख, वसीम आणि गुप्ता या तिघांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरु ठेवला आहे. कोरोना काळानंतर या तिघांनी जिल्ह्यात आपल्या अवैध धंद्याचं वर्चस्व निर्माण केलं असून, पोलिसांच्या कारवाईलाही हे तिघे भीक घालत नाहीत. विशेष म्हणजे, अजूनही यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. illegal tobacco warehouse raid
महावितरणच्या विजेत्यांची नावे जाहीर
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांकडून सुगंधित तंबाखूच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. ८ एप्रिल रोजी बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे स्थानिक गुन्हे शाखेने किरायाच्या गोडावूनवर छापा टाकून ईगल हुक्का, होला हुक्का आणि मजा १०८ ब्रँडच्या तंबाखूचा ५ लाख ६ हजार ९१० रुपयांचा साठा जप्त केला.
सदर तंबाखूचा साठा हरीश अंबाराम ठक्कर याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. tobacco smuggling network busted in Chandrapur
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, मधुकर सामलवार, तसेच पो. का. धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, चेतन गज्जलवार, प्रफुल गारघाटे व मिलिंद टेकाम यांनी केली.
सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा अवैध व्यापार जयसुख, वसीम व गुप्ता यांच्या माध्यमातून बेधडक सुरू आहे. पोलिसांनी जर या मुख्य सूत्रधारांवर निर्णायक कारवाई केली, तर युवकांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराकडे नेणारा सुगंधित तंबाखू जिल्ह्यातून नामशेष होऊ शकतो.
Leave a Comment