MNS leaders Chandrapur : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ४ मनसे पदाधिकारी यांच्यावर एकाचवेळी ट्रक चालकाला पैसे व धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे, मात्र यावर मनसे पदाधिकारी यांनी पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करीत आम्हाला फसविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला आहे. याबाबत मनसे पदाधिकारी यांनी १० एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार व मनसे विधी कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुडे यांच्यावर विविध कलमांतर्गत सावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. extortion case
प्रकरण काय?
७ एप्रिलला हायवा वाहन चालक ३३ वर्षीय विनोद दिवाकर माधुरें हा वाहनात रेती भरून जात होता, त्यावेळी खेडी फाट्यासमोर एक चारचाकी वाहनातील काही व्यक्तींनी हायवा थांबविण्याचा इशारा केला, त्या वाहनातून ४ व्यक्ती बाहेर आले व अश्लील शब्दात शिवीगाळ करू लागले, त्या व्यक्तीने हायवा ट्रक ची चाबी काढली, त्यानंतर वाहनात काय आहे? त्यामध्ये रेती असल्याचे सांगताच रॉयल्टी आहे काय? वाहन ओव्हरलोड आहे, आम्हांला पैसे द्या नाहीतर प्रादेशिक परिवहन विभागाला तक्रार करण्याची धमकी देऊ लागले, पैसे नसल्याने वाहन चालक माधुरे यांनी असमर्थता दाखवली. काही वेळात त्या ४ व्यक्तींनी सावली पोलिसांना फोन करीत बोलावले. Political updates Maharashtra
काही वेळात सावली पोलीस त्याठिकाणी आली हायवा ट्र्क चे कागदपत्रे तपासली, त्या ४ व्यक्तींनी अश्लील शब्दात शिवीगाळ करीत पैसे मागितले अशी तक्रार माधुरे यांनी सावली पोलीस स्टेशनमध्ये केली.
यानंतर सावली पोलिसांनी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, विधी कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुडे आणि मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्यावर बीएनएस कलम 115 (2), 126 (2), 296, 3(5), 308 (3), 351 (2) अंतर्गत गुन्हे दाखल केले. Maharashtra Navnirman Sena news
मनसे पदाधिकारी म्हणतात आमच्यावर चुकीचा गुन्हा?
१० एप्रिलला मनसे पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिले, ७ एप्रिलला आम्ही सर्व पदाधिकारी हिरापूर टोल नाक्याजवळ शाखा उदघाटन करण्यासाठी गेलो होतो, परत येत असताना खेडी फाट्याजवळ एक हायवा ट्रक सुसाट व अनियंत्रितपणे जात होता, पुढे काही अपघात होण्यापूर्वी आम्ही त्या हायवा ट्रक ला थांबवित, वाहन चालकाला याबाबत जाब विचारला त्यावेळी वाहन चालक हा दारू पिऊन होता, याबाबत आम्ही आरटीओ व सावली पोलिसांना माहिती दिली, हायवा ट्र्क चालक माधुरे वर आम्ही ड्रंक अँड ड्राइव्ह चा गुन्हा दाखल करू अशी बतावणी पोलिसानी केली, त्यांनतर आम्ही चारही पदाधिकारी तिथून परत चंद्रपूरला आलो.
फिर्यादी म्हणतो पोलिसांनीच मला मारहाण केली
मात्र दुसऱ्या दिवशी उलट आमच्यावर विविध कलम अंतर्गत गुन्हे दाखल झाले असल्याचे समजले, वाहन चालक माधुरे यांनी आमच्याशी संपर्क साधत मला पोलिसांनी मारहाण करीत दबाव टाकला व गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडले असे सांगितले. विशेष बाब म्हणजे वाहनचालक विनोद दिवाकर माधुरे हे स्वतः पत्रकार परिषदेत उपस्थित होते, ते म्हणाले कि पोलिसांनी मला मारहाण करीत गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.
पोलीस म्हणतात आम्ही नियमाप्रमाणे काम केले
याबाबत सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुरुलवार म्हणाले कि आम्ही कायद्याच्या अधीन राहून गुन्हे दाखल केले आहे, ७ एप्रिलला जो प्रकार घडला त्याबाबत वाहनचालक माधुरे यांनी दिलेल्या बयानावरून आम्ही गुन्हे दाखल केले आहे, राहिला प्रश्न वाहन चालकाने आमच्यावर जे मारहाणीचे आरोप केले तर आमच्या पोलीस स्टेशनमध्ये २४ तास सीसीटीव्ही सुरु असतात,वाहन चालक हा मद्यप्राशन करून होता त्याच्यावर ड्रंक अँड ड्राइव्ह चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज चालक आमच्यावर आरोप करीत असेल तर त्याच्यावर सुद्धा आरोपींनी दबाव आणला असेल. विशेष बाब म्हणजे मनसे पदाधिकाऱ्यांनी किती पैसे मागितले याबाबत काही उत्तर मिळाले नाही. तक्रारीत सुद्धा त्याबाबत उल्लेख नाही, त्यामुळे सदर कारवाई ही सूडबुद्धीने झाली असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारीने राक्षसी रूप धारण केले आहे, मागील वर्ष भरात जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडलेले आहे, त्यावर अजूनही पोलीस दलातर्फे ठोस पाऊले उचलली जात नसून केवळ कारवाईचा फास फेकण्याचे काम सुरु आहे. अश्यात मनसे पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत गंभीर आरोप केले आहे. मनसे पदाधिकारी यांनी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
Leave a Comment