363 offenders externed by Chandrapur police । चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई

January 17, 2026 by Prakash Hande

मतदानाचा हक्क शाबूत

363 offenders externed by Chandrapur police : चंद्रपूर १ डिसेम्बर (News३४) - २ डिसेम्बर रोजी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीचे मतदान आहे, या काळात काही अनुचित घटना घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न व्हावा याकरिता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई करीत शांतता भंग करणाऱ्या तब्बल ३६३ इसमांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हेगारी - ब्रह्मपुरीत लाखोंचा अवैध विदेशी दारूसाठा जप्त

जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक २ डिसेम्बर रोजी होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३ डिसेम्बर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे, तत्पूर्वी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने या दरम्यान शांतता कायम रहावी यासाठी विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ३६३ इसमांवर कलम १६३ (२) अन्व्ये हद्दपारीची कारवाई करण्यात आली, मात्र निवडणुकीच्या दिवशी या इसमांना सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 363 offenders externed by Chandrapur police

पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारी यांनी आपल्या हद्दीतील शांतता भंग करणाऱ्यांची यादी तयार करीत कारवाई साठी प्रस्ताव पाठविला, यावर अपर पोलीस अधीक्षक कातकडे यांनी २७८ तर उपविभागीय दंडाधिकाऱ्यानी ८५ असे जिल्ह्यातील ३६३ इसमांना ३ दिवसांकरिता पोलीस स्टेशन हद्दीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत ३६३ जणांना मतदान मात्र करता येणार आहे त्याकरिता ४ तासांचा वेळ देण्यात आला आहे. अशी माहिती चंद्रपूर पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Comment

+