New Congress president Chandrapur : चंद्रपूर ८ नोव्हेम्बर (News३४) - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी चंद्रपूर शहर कांग्रेस कमिटीमध्ये फेरबदल करण्यात आले आहे, मागील ६ वर्षांपासून चंद्रपूर शहर जिल्हा कांग्रेस कमिटीची यशस्वी धुरा सांभाळणारे शहर जिल्हा कांग्रेस अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या जागी माजी नगरसेवक संतोष लहामगे यांची प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील ६ वर्षांपासून चंद्रपूर कांग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी यांच्या कार्यकाळात अनेक लोकहितकारी आंदोलन करण्यात आले होते, लोकसभा निवडणुकीत मोठे यश चंद्रपूरातून कांग्रेसला मिळाले होते. चंद्रपूर मनपा निवडणुकीपूर्वी कांग्रेस पक्षातील बदलाने आगामी निवडणुकीत पक्षाला याचा काय फायदा होणार? कारण प्रभारी अध्यक्ष माजी नगरसेवक संतोष लहामगे काही काळापासून सक्रिय राजकारणातुन दिसेनासे झाले होते. मागच्या मनपा निवडणुकीत त्यांची पत्नी नगरसेविका पदी जिंकून आल्या होत्या.
संतोष लहामगे हे स्वभावाने अत्यंत शांत आहे, मात्र पक्षाला त्यांच्या नेतृत्वाचा निवडणुकीत लाभ होतो कि नाही हे निवडणुकीनंतर कळेलच.
Leave a Comment